मुंबई : सध्या सणासुदीचे दिवस सुरु असून याकाळात अनेकजण सोनं-चांदीची खरेदी करतात. त्याचबरोबर लगीनसराईला देखील सुरुवात झाली असून दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोनं चांदीच्या दरात वाढ होत होती. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं चांगलंच महागात पडत होतं. मात्र आता सोन्याच्या दरात काहीशी घसरण (gold price fall) झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Gold Rate Today)
WPLमध्ये मुंबई इंडियन्सचीच हवा, मिळवले दुसरे जेतेपद, दिल्लीचे स्वप्न भंग
मिळालेल्या माहितीनुसार, आज सोन्याच्या किंमतीत फक्त १०० रुपयांनी घट झाली आहे. त्यानुसार आजचे सोन्याचे भाव २४ कॅरेट १ ग्रॅम सोने हे ८९ हजार ५६७ रुपयांना विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ७१ हजार ७३६ रुपये आहे. या किंमतीत ८८ रुपयांनी घट झाली आहे. १० ग्रॅम म्हणजेच १ तोळा सोन्याची किंमत ८९ हजार ६७० रुपये आहे. या किंमतीत ११० रुपयांनी घट झाली आहे. तर २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याची किंमत ८ हजार २२० रुपयांना विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ६५ हजार ७६० रुपये आहे. तर १ तोळा सोन्याची किंमत ८२ हजार २०० रुपये आहे.
त्याचबरोबर १८ कॅरेट १ ग्रॅम सोन्याची किंमत ६ हजार ७२६ रुपयांना विकले जात आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५३ हजार ८०८ रुपये आहे. १ तोळा सोन्याची किंमत ६७ हजार २६० रुपये आहे.
चांदीची किंमत काय?
आज चांदीची किंमत (Silver Rate Today) ८ ग्रॅम चांदीची किंमत ८२४ रुपये आहे. १० ग्रॅम चांदी १ हजार ०३० रुपयांना विकली जात आहे. तर १०० ग्रॅम चांदीची किंमत १० हजार ३०० रुपये आहे.