राधे, रंग तुझा गोरा सांग कशाने रापला?
सावळ्याच्या मिठीमध्ये रंग सावळा लागला?
राधे, कुंतल रेशमी… सैरभैर गं कशाने?
उधळले माधवाने किंवा नुसत्या वाऱ्याने?
राधे, नुरले कशाने तुज वस्त्रांचेही भान?
निळा प्रणय अथवा एका बेभानाचे ध्यान?
राधे, कासाविशी अशी… तरी ‘‘वेडी” कशी म्हणू?
तुझ्या रूपाने पाहिली एक वेडीपिशी वेणू!
राधे, दृष्टीतून का गं घन सावळा थिजला?
इथे तुझ्या डोळा पाणी… तिथे मुरारी भिजला!!
डोळा पाणी… जिणे उन्ह… इंद्रधनूचा सोहळा
पुसटले साती रंग…एक ‘‘श्रीरंग” उरला!!
– संदीप खरे
वाटा वाटा वाटा गं
चालीनं तितक्या वाटा गं
माथी छाया, पायी ऊन
प्रवास माझा उफराटा गं
रानफुलांहून फुलने माझे…
हट्टी गं… सहा ऋतुंशी जन्माने मी… कट्टी गं
मैत्रीण माझी मीच मला… अप्रूप माझे
आनंदी मी आनंदाची युक्ती गं
दर्या दर्या दर्या गं
उरात शंभर लाटा गं
लख लख मोती माझ्या आत
कसा मी वेचू आता गं
स्वर – प्रियांका बर्वे
गीत – वैभव जोशी
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…