Tuesday, April 29, 2025

कोलाजसाप्ताहिक

काव्यरंग : राधे, रंग तुझा गोरा

काव्यरंग : राधे, रंग तुझा गोरा राधे, रंग तुझा गोरा सांग कशाने रापला? सावळ्याच्या मिठीमध्ये रंग सावळा लागला? राधे, कुंतल रेशमी... सैरभैर गं कशाने? उधळले माधवाने किंवा नुसत्या वाऱ्याने? राधे, नुरले कशाने तुज वस्त्रांचेही भान? निळा प्रणय अथवा एका बेभानाचे ध्यान? राधे, कासाविशी अशी... तरी ‘‘वेडी” कशी म्हणू? तुझ्या रूपाने पाहिली एक वेडीपिशी वेणू! राधे, दृष्टीतून का गं घन सावळा थिजला? इथे तुझ्या डोळा पाणी… तिथे मुरारी भिजला!! डोळा पाणी... जिणे उन्ह... इंद्रधनूचा सोहळा पुसटले साती रंग…एक ‘‘श्रीरंग” उरला!! – संदीप खरे

वाटा वाटा

वाटा वाटा वाटा गं चालीनं तितक्या वाटा गं माथी छाया, पायी ऊन प्रवास माझा उफराटा गं रानफुलांहून फुलने माझे... हट्टी गं... सहा ऋतुंशी जन्माने मी... कट्टी गं मैत्रीण माझी मीच मला... अप्रूप माझे आनंदी मी आनंदाची युक्ती गं दर्या दर्या दर्या गं उरात शंभर लाटा गं लख लख मोती माझ्या आत कसा मी वेचू आता गं स्वर - प्रियांका बर्वे गीत - वैभव जोशी
Comments
Add Comment