Monday, April 21, 2025
Homeक्रीडाWPLमध्ये मुंबई इंडियन्सचीच हवा, मिळवले दुसरे जेतेपद, दिल्लीचे स्वप्न भंग

WPLमध्ये मुंबई इंडियन्सचीच हवा, मिळवले दुसरे जेतेपद, दिल्लीचे स्वप्न भंग

मुंबई: मुंबई इंडियन्सने शानदार कामगिरी करताना महिला प्रीमियर लीग २०२५ जिंकली आहे. १५ मार्च शनिवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ८ धावांनी पराभव केला. फायनलमध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी १५० धावांचे आव्हान दिले होते. मात्र त्यांना ९ बाद १४१ धावाच करता आल्या.

हरमनप्रीतच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा विमेन प्रीमियर लीगचा खिताब जिंकला आहे. याआधी त्यांनी WPLचा पहिला खिताबही जिंकला होता. हा २०२३मध्ये आयोजित करण्यात आला होता. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स संघाला सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये पराभवास सामोरे जावे लागले. WPLचा दुसरा हंगाम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सला हरवत आपल्या नावे केला होता.

फायनल सामन्यात आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचे ठराविक अंतराने विकेट पडत होते. एकवेळेस दिल्लीची धावसंख्या ६ बाद ८३ झाली होती. ते मोठ्या पराभवाच्या दिशेने जात होते. मात्र दक्षिण आफ्रिकेची ऑलराऊंडर मारिजाने कॅपने तुफानी खेळी करत सामना रोमहर्षक वळणावर ठेवला. दरम्यान, १८व्या शतकांत नेट सायवर ब्राँट नेक कॅपला बाद केले आण दिल्लीच्या आशा मावळल्या.

मुंबईकडून नेट सायबवर ब्रँटने सर्वाधिक तीन विकेट मिळवल्या. तर एमोलिया केरला दोन बळी मिळवता आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -