Wednesday, April 23, 2025
Homeसाप्ताहिककोलाजलिलावातील घर

लिलावातील घर

क्राइम – अ‍ॅड. रिया करंजकर

मान्य लोकांचं उराशी बाळगलेलं सुंदर स्वप्न असतं ते म्हणजे शहरात घर. घर घेण्यासाठी पूर्वीचे लोक रिटायर झाल्यानंतर घरासाठी गुंतवणूक करत असतं. पण आताची नवीन पिढी ही कामाला लागल्या लागल्या बँकेकडून कर्ज घेऊन घर घेतात व आपलं स्वप्न पूर्ण करतात.

रमेश यांनीही बँकेकडून कर्ज घेऊन घर घेतले होते. एक दोन वर्षे बँकेचे हप्ते फेडल्यानंतर त्याला बँकेचे हप्ते काही फेडता येईना म्हणून बँकेने ते घर आपल्या ताब्यात घेतलं. बँकेने ताब्यात घेतलेल्या घरांचा काही दिवसांनंतर लिलाव होतो आणि ही घरं ज्यांना गरज असते ती लोकं घेतात.

रमेश बँकेने ताब्यात घेतलेलं घर लिलावात काढल्यानंतर ते घर कमी पैशांमध्ये होतं म्हणून अजित याने एवढं मोठं घर कमी पैशात मिळते म्हणून लगेच ते घर विकत घेतलं. अशी घरं घेताना बँकेचे फॉर्म असतात, ते फॉर्म व्यवस्थित वाचावे लागतात. आपल्याला घर मिळते तेही कमी पैशात, या आनंदात अजित होता. त्याने पैशाचा व्यवहार केल्यानंतर तो लगेचच त्या घरामध्ये राहायला गेला. अजित त्या घरामध्ये राहायला गेल्यानंतर सोसायटीकडे शेअर सर्टिफिकेटवर नाव चढवण्यासाठी तो गेला असता त्याला सोसायटीच्या ऑफिसमधून मेंटेनन्सची पावती देण्यात आली. पावतीवर दीड लाख मेंटेनन्स भरण्यासाठी सोसायटीने सांगितलं होतं. अजित लगेचच त्याच दिवशी सोसायटी ऑफिसमध्ये गेला आणि मी तर गेल्या महिन्यातच राहायला आलो आणि मला दीड लाख रुपये मेंटेनन्स कसा काय? त्यावेळी सोसायटीतल्या सेक्रेटरी आणि चेअरमनने सांगितलं की, अगोदरच्या मालकाने मेंटेनन्स भरलंच नव्हतं त्याच्यामुळे तो मेंटेनन्स आता तुम्हाला भरावा लागेल. हे ऐकल्यावर त्याला धक्काच बसला. तो बोलला मी तर घर आत्ताच विकत घेतले आहे. मग मी हे मेंटनन्स भरणार नाही. दुसऱ्या दिवशी अजित बँकेकडे गेला आणि मी तुमच्याकडून घर विकत घेतले आहे त्याच्यामुळे मेंटेनन्स मी भरणार नाही, असं त्यांनी बँकेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं. त्यावेळी पदाधिकारी म्हणाले की, आम्ही तुम्हाला फॉर्म देताना काही गोष्ट नमूद केलेल्या असतात त्या तुम्ही व्यवस्थित वाचल्या पाहिजे होत्या.

लिलावातली जी घरं असतात त्या घरांचे अगोदरच्या मालकाने काही थकीत बाकी असतील ती नवीन मालकाला भरावी लागतात. ते मेंटेनन्स असो, रजिस्ट्रेशन फी असो की इतर कोणत्याही गोष्टी असो. ती जबाबदारी ही नवीन घर मालकाची असते. घर घेण्याच्या आनंदात अजितने बँकेचा फॉर्म वाचलाच नव्हता. कमी पैशात घर मिळते म्हणून त्यांनी लगेच ते घर विकत घेतलेले होते. रमेशने बँकेचे हप्ते, पेमेंट या गोष्टी थकवल्या होत्या. म्हणून बँकेने ते आपल्या ताब्यात घेतलेले होते आणि कमी पैशांमध्ये ते घर अजितला विकलेले होते. पण त्या घराचे जे थकीत होते ते मात्र आता अजितच्या माथी पडले होते. म्हणून त्याने पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी बँकेची लोकं, सोसायटीचे सेक्रेटरी यांच्याकडे कसून चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी अजित यांना न्यायालयात जाऊन प्रश्न सोडवण्यास सांगितले. रमेशने हे घर विकत घेतल्यापासून सोसायटीचा मेंटेनन्स दिलेला नव्हता. तो थकीत होता. त्यामुळे अजित यांना त्याचा भरणा सोसायटीला करावाच लागणार होता.

अजित यांनी घर विकत घेताना थकीत रकमा बघणे गरजेचे होते. थकीत न बघितल्यामुळे या सर्व अडचणी निर्माण झाल्या होत्या. अजितने रमेशला गाठून तू राहत होतास ते मेंटेनन्स भर असं सांगितलं, आता ते माझं घर नाही. माझं घर बँकेने घेतले आहे. त्यामुळे मेंटेनन्स भरायचा प्रश्नच येत नाही, असे रमेशने सांगितले.

कमी पैशात घर घेऊन अजित पस्तावत होता. जरी कमी पैशात घर मिळाले तरी मेंटेनन्स, रजिस्ट्रेशन या सगळ्या गोष्टी बाकी होत्या. हलगर्जी केल्यामुळे त्याला आता न्यायालयाशिवाय कोणताही पर्याय उरलेला नव्हता. जी घरं बँक लिलावासाठी काढतात तेव्हा जे ग्राहक बँकेकडून घर विकत घेतात त्यांनाही अंधारात ठेवतात. कारण त्यांना ती घरे विकायची गरज असते. त्याच्यामुळे ग्राहकाने सगळी चौकशी केल्याशिवाय घर घेऊ नये. नाहीतर अजितसारखी परिस्थिती निर्माण होते. आज अजितने कमी पैशात जरी घर घेतलं तरी त्याला कोर्टाच्या आता फेऱ्या माराव्या लागणार होत्या. कारण त्याला न्याय हवा होता. सोसायटीचा थकलेला मेंटेनन्स भरल्याशिवाय अजितचे नाव शेअर सर्टिफिकेटवर येणार नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -