इस्लामाबाद : बलोच लिबरेशन आर्मी अर्थात बीएलए या संघटनेने दावा केला आहे की त्यांच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ९० जवान ठार झाले. पाकिस्तानच्या लष्कराचा ताफा क्वेट्टा येथून तफ्तानच्या दिशेने जात होता. यावेळी नोशकी जिल्ह्यात पाकिस्तानच्या लष्करी वाहनांना लक्ष्य करुन हल्ला करण्यात आला. हा हल्ला यशस्वी झाला. या हल्ल्यात पाकिस्तानचे ९० जवान ठार झाल्याचा दावा बीएलएने प्रसिद्धीपत्रक काढून केला आहे.
Abu Qatal killed : हाफिझ सईदचा विश्वासू सहकारी अबू कताल अज्ञातांच्या हल्ल्यात ठार
क्वेट्टाहून तफ्तानला जाणाऱ्या लष्करी ताफ्यात सात बस आणि दोन मोठी वाहने होती. यातील एका बसला आयईडी भरलेल्या वाहनाने धडक दिली. पाठोपाठ दुसऱ्या बसवर रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेडद्वारे (आरपीजी) हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ९० जवानांचा मृत्यू झाला आणि अनेक जवान गंभीर जखमी झाले. जखमी जवानांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Air Strikes against Houthi : अमेरिकेचा हुती अतिरेक्यांवर ‘एअर स्ट्राईक’
बलोच लिबरेशन आर्मी अर्थात बीएलए या संघटनेने प्रसिद्धपत्रक काढून दावा केला आहे की, नोशकी येथील आरसीडी महामार्गावरील रख्शान मिलजवळ व्हीबीआयईडी हल्ल्यात ९० जवान ठार झाले. हा हल्ला बीएलएच्या माजिद ब्रिगेड या आर्मी युनिटने केला आहे. लष्करी ताफ्यातील बसपैकी एक बस पूर्ण नष्ट झाली आहे. इतर वाहनांचेही नुकसान झाले आहे.