
मुंबई : ऑस्कर विजेते संगीतकार आणि गायक ए. आर. रेहमान (A. R. Rahman) यांच्याबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आज सकाळी दिग्गज गायक ए.आर रेहमान यांची प्रकृती खालावल्याने त्यांना चेन्नईतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ए. आर. रेहमान यांच्या टीमकडून अद्याप त्यांच्या प्रकृतीविषयी कोणतीही अपडेट समोर आली नाही. मात्र त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती सोशल मीडियावर पसरताच चाहत्यांकडून काळजी व्यक्त केली जात आहे.

मुंबई : सध्या सणासुदीचे दिवस सुरु असून याकाळात अनेकजण सोनं-चांदीची खरेदी करतात. त्याचबरोबर लगीनसराईला देखील सुरुवात झाली असून दागिने खरेदी ...
ए.आर. रेहमान यांना काय झाले?
आज (दि.१६ मार्च) सकाळी ए. आर. रेहमान यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने चेन्नईतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. छातीत दुखत असल्याने रेहमान यांची ईसीजी (ECG) आणि इकोकार्डिग्राम चाचणीसुद्धा करण्यात आली. सध्या त्यांच्यावर हृदयाशी संबंधित विशेष डॉक्टरांकडून उपचार करण्यात येत आहे. तसेच त्यांच्यावर एंजिओग्राम करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.