Wednesday, May 28, 2025

विदेशताज्या घडामोडी

नॉर्थ मॅसेडोनियाच्या नाईट क्लबमधील आगीत ५० जणांचा मृत्यू, अनेक जखमी

नॉर्थ मॅसेडोनियाच्या नाईट क्लबमधील आगीत ५० जणांचा मृत्यू, अनेक जखमी

स्कोप्जे : उत्तर मॅसेडोनिया देशातील कोकानी शहरातील पल्स नाईटक्लबमध्ये रविवारी(दि. १६) पहाटे भीषण आग लागली. या दुर्घटनेत किमान ५० जणांचा मृत्यू झाला आहे.तर अनेक जण जखमी झालेत.


उत्तर मॅसेडोनियाच्या गृह मंत्रालयाचा हवाल्‍याने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर मॅसेडोनियाच्या राजधानी स्कोप्जेपासून सुमारे १०० किमी पूर्वेला असलेल्या कोकानी येथील पल्स नाईटक्लबमध्ये रविवारी(दि. १६) पहाटे प्रसिद्ध हिप-हॉप जोडी एडीएनच्या लाईव्ह परफॉर्मन्स सुरु होता. यावेळी अचानक आग लागली. कार्यक्रमाला सुमारे १,५०० लोक उपस्थित होते.या भीषण दुर्घटनेत ५० जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत.


या घटनेशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये नाईट क्लबमध्ये मोठी आग लागल्याचं आणि आकाशात दाट धुराचे लोट दिसत आहेत. या घटनेतील जखमींना शहराच्या दक्षिणेस सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या कोकानी आणि स्टिप येथील स्थानिक रुग्णालयात दाखल केले आहे. नाईटक्लबमध्ये सुरु असलेल्या कार्यक्रमादरम्यान आतिषबाजीमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे.

Comments
Add Comment