नवी दिल्ली : भारतीय स्टार लेग स्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) बऱ्याच दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. चहलने २०२३ मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला. तथापि, तो २०२४ च्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता. पण या स्पर्धेतही तो फक्त बेंचवर बसून राहिला. आता तो आयपीएल २०२५ दरम्यान खेळताना दिसणार आहे. याआधी युजवेंद्र चहलने एक मोठा निर्णय घेतला. (RJ Mahavash ) ही लीग संपताच तो क्रिकेट खेळण्यासाठी परदेशात जाईल. ज्यासाठी त्याने एका संघासोबत करार केला आहे. युजवेंद्र चहल पुन्हा एकदा इंग्लंडमध्ये होणाऱ्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. २०२५ च्या हंगामात चहल नॉर्थम्प्टनशायरकडून खेळताना दिसेल. तो या संघाकडून यापूर्वीही खेळला आहे. त्याचा करार जून ते २०२५ हंगामाच्या अखेरीपर्यंत राहील. या काळात तो काउंटी चॅम्पियनशिप आणि वन-डे कपसाठी उपलब्ध असेल. यापूर्वी तो २०२३ मध्ये या क्लबमध्ये सामील झाला होता. त्यानंतर त्याने नॉर्थम्प्टनशायरला डिव्हिजन टू मध्ये चौथ्या स्थानावर नेले आणि चार सामन्यात २१.१० च्या सरासरीने १९ चॅम्पियनशिप विकेट्स घेतल्या. त्याचवेळी, क्लबसाठी त्याच्या लिस्ट ए पदार्पणात, त्याने केंटविरुद्ध १४ धावा देत ५ विकेट्स घेतल्या.(Yuzvendra Chahal New Inning)
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह आयपीएलच्या ३ सामन्यांमधून बाहेर!
नॉर्थम्प्टनशायरमध्ये पुन्हा सामील होण्याबद्दल युजवेंद्र चहल म्हणाला, ‘गेल्या हंगामात मी येथे माझा वेळ खूप एन्जॉय केला होता, त्यामुळे परत आल्याने मला खूप आनंद होत आहे. त्या ड्रेसिंग रूममध्ये काही उत्तम लोक आहेत आणि मी पुन्हा त्याचा भाग होण्यासाठी उत्सुक आहे. आम्ही हंगामाच्या शेवटी काही उत्तम क्रिकेट खेळलो, त्यामुळे आशा आहे की आम्ही ते पुन्हा करू शकू आणि काही मोठे विजय मिळवू शकू. दुसरीकडे, ‘जगातील सर्वोत्तम लेग स्पिनरपैकी एक या हंगामात नॉर्थम्प्टनशायरमध्ये परतत आहे याबद्दल मी खरोखर उत्साहित आहे.