नवी दिल्ली : स्टार इंडियन आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा फलंदाज विराट कोहली सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. विराट इंडियन प्रीमियर लीगच्या १८ व्या सिझनपूर्वी, नव्या लूकचे (virat kohli new haircut) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. क्रिकेट शिवाय अनेक विहाट कोहलीची स्टाईल, फॅशन खूप आवडते. अनेक चाहते अगदी त्याच्यासारखाच लूक करतात. प्रसिद्ध सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट आलिम हकीम (Alim Hakim) यांनी त्यांच्या इंस्टाग्राम फीडवर कोहलीच्या नव्या लूकमधील फोटो पोस्ट केले आहेत.नवीन हेअरस्टाईल आणि कोरलेल्या दाढीमधील कोहलीचा नवीन लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.(Virat Kohli New Hairstyle)
Yuzvendra Chahal New Inning : युजवेंद्र चहलच्या नव्या इनिंगला सुरुवात
या स्टार खेळाडूच्या आकर्षक स्लीक लूकवर नेटिझन्स आश्चर्यचकित झाले आहेत इंस्टाग्राम पोस्टवरील स्थान आणि फोटोमध्ये मागे दिसणाऱ्या उंच इमारती पाहून हे स्पष्ट होते की कोहलीचे ग्रूमिंग सेशन दुबईमध्ये पार पडले. (Alim Hakim) विशेष म्हणजे, हकीम हा लोकप्रियता जगभरात आहे आणि त्याने भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्ये अनेक आउटलेट सुरू केले आहेत.