Tuesday, April 29, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Bangladeshi Citizens : तीन बांग्लादेशी आरोपींना प्रत्येकी २ वर्षे कारावासाची शिक्षा

Bangladeshi Citizens : तीन बांग्लादेशी आरोपींना प्रत्येकी २ वर्षे कारावासाची शिक्षा

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी एमआयडीसीतील दोन कंपन्यांमध्ये नोकरी व वास्तव्य करणार्‍या तीन बांग्लादेशी नागरिकांवर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत मोहोळ प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी स. वा.ठोंबरे यांनी आरोपींना प्रत्येकी २ वर्षे कारावास व प्रत्येकी १० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.

कोणत्याही वैद्य कागदपत्रांशिवाय तसेच भारत-बांग्लादेश सीमेवरील मुलकी अधिकारी यांच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या अवैद्य मार्गाने भारतात प्रवेश करून येथील दोन कंपन्यांमध्ये बांग्लादेशी राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनानुसार मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ कदम यांच्या टीमने संयुक्त कारवाई करत दि. २६ डिसेंबर रोजी कंपनीमधील कामगारांसाठी राहण्याकरता बांधलेल्या खोल्यांमध्ये चंचल विश्वनाथ पहान, अजहर अली हुजूर अली हटवली, मीनल शनिचर कुलमनी हेलराम सर्व (रा. बांग्लादेश) तिघांना अटक केले. तिघांच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करून सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजना फाळके यांनी आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र तयार करून ते प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मोहोळ कोर्टात दाखल केले होते.

Comments
Add Comment