Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीस्टरलाईट पॉवर कडून शेतकऱ्यांना मोबदला

स्टरलाईट पॉवर कडून शेतकऱ्यांना मोबदला

पालघर(वार्ताहर): गुजरातमधून महाराष्ट्रात हरित ऊर्जा आणण्याच्या प्रकल्पाचे काम २०३० पर्यंत पूर्ण होणार असून ५०० गीगावॅट ऊर्जा निर्माण करण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाला बळ देणारा हा उपक्रम असून स्टरलाईट पॉवरने याबाबत ज्यांच्या जमिनीखालून ट्रान्समिशन लाईन जाणार आहे, त्यांना मोबदला देण्याचे धोरण ठरवले आहे. विक्रमगड तालुक्यातील मान गावातील शेतकरी विष्णू चैतन्य दळवी यांना स्टरलाईट पॉवर कडून मोबदला देण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

मुंबईत अवजड वाहनांना रविवारी ‘नो एन्ट्री’

मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये वाढत्या विजेची मागणी लक्षात घेऊन गुजरातमधून हरित ऊर्जा आणण्याचा प्रकल्पाचे काम सुरू आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचा काही भाग वापरण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी स्टरलाईट पॉवरने त्यांना योग्य मोबदला देण्याचे धोरण निश्चित केले आहे.

वरंधा घाटात एसटी बस कोसळली, १५ प्रवासी जखमी

अनेक वेळा मोठ्या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना आपल्या जमिनी गमवाव्या लागतात पण स्टरलाईट पॉवरच्या या प्रकल्पात शेतकऱ्याची जमीन त्यांच्या नावावरच राहणार आहेत. सातबारा उताऱ्यावर कंपनीचे कोणतेही नाव लागणार नाही. केवळ ट्रान्समिशन टॉवर्स उभारण्यासाठी लागणाऱ्या जागेचा उपयोग कंपनीमार्फत करण्यात येणार आहे आणि त्याचा योग्य मोबदला सुद्धा देण्यात येणार असल्याचे स्टलाईट पॉवर कडून सांगण्यात आले आहे.

या प्रकल्पाचे काम २७ ठिकाणी सुरू असून शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने त्याचा मोबदला देण्यात येणार आहे. नुकसान भरपाई देताना फक्त जमीन नाही तर पिकाचे नुकसान लक्षात घेऊन त्या पद्धतीने त्यांना योग्य तो मोबदला कंपनीकडून देण्यात येणार आहे. स्थानिक प्रशासन आणि शेतकऱ्यांची थेट संवाद साधण्याची प्रक्रिया सुद्धा कंपनीकडून सुरू करण्यात आली आहे. प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य बदलाबाबत त्यांना माहिती दिली जात आहे शेतकऱ्यांच्या हक्काची जपणूक करत त्यांना विश्वासात घेत आणि योग्य मोबदला देतच हा प्रकल्प पुढे नेण्याचा कंपनीचा मानस असल्याचेही कंपनीने दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -