Friday, April 18, 2025
Homeताज्या घडामोडीMumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गावर चाकरमान्यांचा खोळंबा, प्रचंड वाहतूककोंडी!

Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गावर चाकरमान्यांचा खोळंबा, प्रचंड वाहतूककोंडी!

मुंबई : होळी आणि धूलिवंदनाचा (Holi 2025) सण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे. अनेक चाकरमानी होळी साजरी करण्यासाठी गावी देखील गेले होते. दरम्यान आता शिमगा संपला असून चाकरमान्यांनी मुंबईची वाट धरली आहे. मात्र या चाकरमान्यांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. (Mumbai Goa Highway)

Dhule News : …अन् मेलेलं बाळ पुन्हा जिवंत झालं! धुळ्यात घडला ‘असा’ चमत्कार

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) माणगाव आणि इंदापूरजवळ अभूतपूर्व वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली आहे. याचा फटका मुंबई आणि परिसरातून कोकणात निघालेल्या शेकडो कुटुंबीयांना बसला आहे. दुसरीकडे, कोकणातून मुंबई आणि उपनगरांच्या दिशेने येणारी वाहनेही दुसऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडीत अडकली आहेत. वाहनांची जवळपास सहा ते सात किलोमीटरपर्यंत रांग लागली आहे असून कासवगतीने वाहने पुढे सरकत आहेत. भरउन्हात वाहतूक कोंडीतून वाट काढताना कारचालकांना कसरत करावी लागत आहे.

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने ही वाहतूक कोंडी होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर होळीसह शनिवार रविवार जोडून आल्याने विकेंड घालवण्यासाठी कोकणात, मुंबईस व पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्यांची वर्दळ वाढली आहे. यामुळे सध्या वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना केल्या जात असून, वाहनचालकांना संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -