Sunday, April 20, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्सRasika Wakharkar : अशोक मामांसोबत काम करणं हे स्वप्न होतं…

Rasika Wakharkar : अशोक मामांसोबत काम करणं हे स्वप्न होतं…

टर्निंग पॉइंट – युवराज अवसरमल 

पिरतीचा वणवा उरी पेटला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली ‘सावी’ म्हणजेच रसिका वाखारकर प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात राहिलेली आहे. अशोक मा.मा या मालिकेतून ती वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांना पहायला मिळत आहे.

रसिका मूळची अलिबागची. तेथील कन्याशाळेत तिचे शिक्षण झाले. तेथील नृत्य, समूह गीत, वक्तृत्व स्पर्धा, अशा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तिने भाग घेतला. स्पोर्ट्समध्येही तिचा सहभाग असे. वयाच्या १० व्या वर्षांपासून तिने भरतनाट्यम शिकण्यास प्रारंभ केला. सोबतच शास्त्रीय संगीताचे धडे ती घ्यायला लागली.

१२ व्या वर्षांपर्यंत ती नृत्य शिकत होती. अरंगेत्रम् पूर्ण करून ती नृत्य विशारद झाली. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये तिने जर्मन भाषेमध्ये पदवी घेतली. संस्कृत भाषेमधून तिने नाटकाला सुरुवात केली. ‘उंच माझा झोका’ हे त्या संस्कृत नाटकाचे मराठी नाव होते. बी. ए. तिने जर्मन भाषेतून केले.

फिरोदिया करंडक स्पर्धेत तिने काम केले. व्हाय सो गंभीर ‘हे नाटक तिने केले. ‘पिरतीचा वणवा उरी पेटला’ ही मालिका तिच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरली. त्यातील तिच्या सावी या व्यक्तिरेखेस प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. गावातील रांगडी सावी ही लेडी रॉबिनहूडची भूमिका होती. या भूमिकेने प्रेक्षकांची मने काबीज केली. ‘गाथा नवनाथाची’, ‘जय शिवाजी जय भवानी ‘ह्या मालिकेत तिने काम केले.’ मेकअप’,’साईड मिरर’ या चित्रपटात तिने काम केले.

कलर्स वाहिनीवरील ‘अशोक मा.मा’ या मालिकेत सध्या ती काम करीत आहे. भैरवी मुजुमदार असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव आहे. भैरवी ही शहरातील,मॉडर्न, स्ट्राँग,स्वतंत्र, कॉर्पोरेट जगात वावरणारी आहे. ती बेधडक, स्वतःच्या पायावर उभी असलेली अशी व्यक्तिरेखा आहे.

या मालिकेत अशोक मामासोबत वादविवाद घालताना ती दिसते. अर्थात त्याला सुद्धा काहीतरी कारण असतं.
अशोक मा.मा ही मालिका कशी मिळाली असे विचारल्यावर रसिका म्हणाली की पिरतीचा वनवा उरी पेटला ही मालिका खूप गाजली. ती मालिका व माझं काम अशोकजीना आवडायचं. या मालिकेचे लेखक चिन्मय मांडलेकर आहेत, जे माझ्या पूर्वीच्या मालिकेचे सुद्धा लेखक होते. या मालिकेतील भैरवी हे पात्र मी साकारावं असे अशोक मामांना वाटत होते, त्याबद्दल ते आग्रही होते. साहजिकच त्यामुळे ही मालिका मला मिळाली.

या मालिकेत अशोक मामांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता असे विचारल्यावर ती म्हणाली की, त्यांच्या सोबत काम करणं हे माझं स्वप्न होतं, जे या मालिकेमुळे शक्य झाले. अशोकमामा सोबत स्क्रीन शेअर करताना एक जबाबदारीची जाणीव होते. मामा समुद्रासारखे साऱ्यांना सामावून घेणारे आहेत.

सेटवर ते मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करतात. मामा आमच्या वयाचे होऊनच सेटवर वावरत असतात.यामुळे त्यांच्यासोबत काम करताना कसलेही दडपण येत नाही. अशोक मामा सोबत काम करताना त्यांना पाहून देखील भरपूर शिकता येते. त्यांच्या सान्निध्यात राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे.

रसिकाला लोकनृत्य करण्याची आवड आहे. तिला भविष्यातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -