नव दिल्ली : आयपीएल २०२५ पूर्वी राजस्थान रॉयल्स संघाचे हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते कुबड्या घेऊन चालताना दिसत आहेत. इंडियन प्रीमियर लीगच्या १८व्या हंगामाची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या १० दिवसांमध्ये आयपीएल २०२५ चा पुढील सीझन सुरू होत आहे. २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या तयारीसाठी सर्व १० फ्रँचायझींचे प्री-सीझन कॅम्पही सुरू झाले आहेत.(Rahul Dravid Health)
यंदा सर्वच संघांचे चित्र बदलले असणार आहे, (Rahul Dravid Health) अनेक खेळाडूंची अदलाबदली झालेली पाहायला मिळणार आहे. दरम्यान राजस्थान रॉयल्स संघाचे हेड कोच राहुल द्रविड यांचा कॅम्पमधून एक व्हीडिओ समोर आला आहे. आयपीएल २०२५ च्या सीझनमध्ये भारताच्या क्रिकेट संघाचे माजी हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) आता राजस्थान रॉयल्सच्या हेड कोचच्या भूमिकेत दिसणार आहेत. आयपीएल २०२५ सुरू होण्यापूर्वी संघाच्या ट्रेनिंग कॅम्पमधील राहुल द्रविड पोहोचले होते, तेव्हा ते क्रॅचेसच्या सहाय्याने चालताना दिसले.