Friday, May 23, 2025

मनोरंजनमल्टिप्लेक्सब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Chhaava Box Office Collection : छावा चित्रपटाने महिन्याभरात केली एवढी कमाई

Chhaava Box Office Collection : छावा चित्रपटाने महिन्याभरात केली एवढी कमाई
मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित छावा या हिंदी चित्रपटाने अवघ्या ३० दिवसांत ५४९.६७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या उत्पन्नात दररोज कोट्यवधी रुपयांची वाढ होत आहे. चित्रपटाच्या ३० व्या दिवसाचे अर्थात आजचे (शनिवार १५ मार्च २०२५) बॉक्स ऑफिस कलेक्शनचे अंतिम आकडे रविवारी किंवा सोमवारी जाहीर केले जातील. यानंतर महिन्याभरात चित्रपटाने केलेल्या कमाईची अंतिम आकडेवारी जाहीर होईल. सध्याचा कल बघता छावा चित्रपट महिन्याभरात ५५० कोटींपेक्षा जास्त कमाई करेल, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.



अभिनेता विकी कौशल याने केलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये छावा हा सर्वाधिक यशस्वी म्हणता येईल. याआधी विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या उरी द सर्जिकल स्ट्राईक या हिंदी चित्रपटाने महिन्याभरात २४४.१४ कोटी रुपयांची कमाई केली होती. यापेक्षा जास्त कमाई छावा या हिंदी चित्रपटाने केली आहे.



अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने केलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये छावा हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक यशस्वी म्हणता येईल. याआधी रश्मिका मंदानाची प्रमुख भूमिका असलेल्या पुष्पा द रूल पार्ट टू या हिंदी चित्रपटाने महिन्याभरात ८१२.१४ कोटी रुपयांची आणि 'अॅनिमल'ने ५०२.९८ कोटी रुपयांची कमाई केली होती.



अभिनेता अक्षय खन्ना याने केलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये छावा हा सर्वाधिक यशस्वी म्हणता येईल. याआधी अक्षय खन्नाची प्रमुख भूमिका असलेल्या मॉम या हिंदी चित्रपटाने महिन्याभरात ३७.२८ कोटी रुपयांची कमाई केली होती. यापेक्षा जास्त कमाई छावा या हिंदी चित्रपटाने केली आहे.

छावा या हिंदी चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २१९.२५ कोटी रुपयांची, दुसऱ्या आठवड्यात १८०.२५ कोटी रुपये, तिसऱ्या आठवड्यात ८४.०५ कोटी रुपये आणि चौथ्या आठवड्यात ५५.९५ कोटी रुपयांची कमाई केली. पाचव्या आठवड्यातील चित्रपटाच्या कमाईची आकडेवारी शुक्रवार २१ मार्च रोजी जाहीर केली जाईल.
Comments
Add Comment