

वारकऱ्यांना इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यास मनाई
पुणे (प्रतिनिधी): तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी वारकऱ्यांसाठी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. १४ ते १६ मार्च दरम्यान ...
न्यू इंडिया को – ऑपरेटिव्ह बँकेतील अपहारातील रक्कम कपिल देढिया याच्या बँक खात्यात जमा झाली होती. त्याला अटक करण्यात आली. वडोदरा येथे शोधमोहिम राबवून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला शनिवारी मुंबईत आणण्यात आले आणि सकाळी ११.३० वाजता औपचारिकपणे अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायलायने आरोपीला १९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

वरंधा घाटात एसटी बस कोसळली, १५ प्रवासी जखमी
पोलादपूर (वार्ताहर) : महाडच्या दिशेने येणारी एसटी बस शनिवारी ५० फूट दरीत कोसळली. ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले ...
तपासानुसार, त्याच्या खात्यात अपहारातील १२ कोटी जमा करण्यात आले होते. याप्रकरणातील आरोपी मनोहर अरूणाचलम याच्या अटकेनंतर देढिया गायब झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी तीन पथके राजस्थान व गुजरातमध्ये पाठवण्यात आली होती. अखेर पोलिसांनी त्याला वडोदरा येथे ताब्यात घेतले. आतापर्यंत या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यात बँकेचे महाव्यवस्थापक हितेश मेहता, बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन, बँकेचे सीईओ अभिमन्यू भोअन, मनोहर उन्ननाथन यांचा समावेश आहे.याशिवाय याप्रकरणात हिरेन भानू, गौरी भानू, उन्ननाथन अरूणाचलमसह देढियालाही आरोपी करण्यात आले आहे. या चौघांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी करण्यात आल्या होत्या. भानू दाम्पत्याने अपहारातील सुमारे २८ कोटी प्राप्त केल्याचा संशय असून ते विदेशात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी महाव्यवस्थापक हितेश मेहताच्या मालमत्तांची माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. तपासाअंती त्यांच्यावर टाच आणण्याची कारवाई करण्यात येणार आहे.