मुंबई : विरारमध्ये (Virar Crime)एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार फाट्याजवळील पिरकुंडा दर्ग्याजवळ एका सुटकेसमध्ये धड नसलेले महिलेचं मुंडकं आढळलं आहे. सध्या या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरारच्या शिरवली गावाजवळ ही घटना घडली. गुरूवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. गुरूवारी संध्याकाळी काही तरूणांचा ग्रुप मांडवी जवळील शिरवली गावात येथे जात होता. तेथे या तरूणांना एक सुटकेस दिसली. तरुणांनी सुटकेस उघडताच त्यामध्ये महिलेचं मुंडकं आढळलं. यामुळे एकच खळबळ उडाली. त्यांनी त्वरित ही बाब स्थानिक मांडवी पोलिसांना कळवली.