Friday, May 9, 2025

ताज्या घडामोडीश्रध्दा-संस्कृती

घराच्या या दिशेला पैसे ठेवण्यास करा सुरूवात, वाढेल धन-दौलत

घराच्या या दिशेला पैसे ठेवण्यास करा सुरूवात, वाढेल धन-दौलत

मुंबई: अनेकदा लोक घरात पैसा अथवा सोने-चांदी ठेवण्याआधी दिशेकडे लक्ष देत नाही. अनेकदा दिशेसंदर्भात केलेली ही चूक आपल्याला आर्थिक समस्या निर्माण करू शकते.


दरम्यान, वास्तुशास्त्रानुसार पैसा अथवा सोने-चांदी ठेवण्यासाठी योग्य दिशा सांगण्यात आली आहे. वास्तुशास्त्रानुसार, आर्थिक समृद्धी आणि स्थिरतेसाठी पैसा नेहमी दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात ठेवले पाहिजे.


दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात तुम्ही सोने-चांदी तसेच कोणत्याही प्रकारचे दस्तावेज ठेवू शकता. वास्तुशास्त्रानुसार जर या दिशेला पैसा तसेच सोने-चांदी ठेवल्यास नेहमी यात वाढ होते. जर तुम्ही योग्य दिशेला पैसा ठेवला तर पैशाशी समस्या कमी होण्यास मदत होते.


वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घराच्या उत्तर दिशेला पैसा ठेवलात तर लक्ष्मी मातेची कृपा कायम राहते. तसेच पैसा नेहमी दक्षिण-पूर्व आणि पश्चिम दिशेला ठेवू नये. यामुळे नुकसान होऊ शकते.

Comments
Add Comment