Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीकपडे, चपला, फोन, परफ्यूम...या रंगाच्या गोष्टी असतात सगळ्यात महाग! जाणून घ्या कारण

कपडे, चपला, फोन, परफ्यूम…या रंगाच्या गोष्टी असतात सगळ्यात महाग! जाणून घ्या कारण

मुंबई: जर तुम्ही फोन, घड्याळ, कपडे, चपला अथवा फॅशनशी संबंधित कोणतीही गोष्ट खरेदी करायला जाल तर तुम्हाला सगळ्यात महाग गुलाबी म्हणजेच पिंक कलर मिळेल. खरंतर गुलाबी रंगाच्या गोष्टी महाग असतात कारण मुलींना हा रंग आवडतो.

याला खरंतर पिंकटॅक्स म्हटले जाते.हा काही सरकारी टॅक्स नाही. हा टॅक्स ते सामान तसेच सेवांना दर्शवतो जो महिलांसाठी महाग असतो आणि पुरुषांसाठी स्वस्त पर्याय असते. पिंक टॅक्सला विरोध करणाऱ्यांचे म्हणणे आहे की हा किंमतीतील भेदभाव आहे आणि अशा प्रकारचा टॅक्स असता कामा नये. त्यांचे म्हणणे आहे की महिलांकडून अधिक पैसे उकळण्याचा कंपन्यांनी निवडलेला हा मार्ग चुकीचा आहे.

त्यांच्या मते जर एखाद्या महिलेचे उत्पादन बनवण्यासाठी अधिक खर्च होत असेल तर ते महाग असणे साहजिक आहे. दरम्यान, काहींचे म्हणणे आहे की मागणीच्या हिशेबाने उत्पादनाची किंमत वाढते. जसे महिलांसाठी बनवले जाणारे कपडे, चपला, तसेच कॉस्मेटिक्सच्या किंमती अधिक असतात.

उदाहरणार्थ, जी उत्पादने महिलांसाठी बनवलेली असतात तसेच ज्यांचा रंग गुलाबी असतो त्या इतर रंगाच्या उत्पादनापेक्षा महाग असतात. समान लाल अथवा निळ्या रंगाच्या बाईक, स्कूटर आणि हेल्मेटच्या तुलनेत गुलाबी रंगाच्या सायकल, हेल्मेट तसेच इतर मुलींसाठी बनवण्यात आलेली खेळणी आणि गिअर अधिक महाग असतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -