Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीChandrashekhar Bawankule : संजय राऊतांनी रोज सकाळचा शिमगा बंद करावा!

Chandrashekhar Bawankule : संजय राऊतांनी रोज सकाळचा शिमगा बंद करावा!

चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला

मुंबई : राज्यभरात होळी आणि धूलिवंदनाचा सण (Holi 2025) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सर्वसामान्यांसह दिव्यंग तसेच अनेक राजकीय नेते देखील कुटुंबासह धुळवडीचा आनंद घेत आहेत. अशातच राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी धुळवडीच्या शुभेच्या देत संजय राऊतांना (Sanjay Raut) टोला लगावला आहे.

Rajkot Fire : राजकोटमधील इमारतीला आग, तिघांचा होरपळून मृत्यू

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज (१४ फेब्रुवारी) सकाळी सात वाजल्यापासून आपल्या कार्यकर्त्यांसोबत धुळवडीचा उत्सव साजरा करत आहेत. मतभेद विसरुन एकत्र येण्याचा होळी हा सण असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी संजय राऊतांना शुभेच्छा देत, रोज सकाळी ९ वाजताचा शिमगा त्यांनी बंद करावा आणि महाराष्ट्राच्या विकासाकरिता सुचना कराव्यात असा टोला लगावला. ‘संजय राऊत (Sanjay Raut) रोज सकाळी ९ वाजता जो शिमगा साजरा करतात तो बंद करुन, महाराष्ट्राच्या हितासाठी सुचना कराव्यात. वर्षभर शिमगा साजरा करता. आज होळीच्या दिवशी तो शिमगा न करता मुख्यमंत्री देवेंद्रजींना, आम्हा सगळ्यांना विकासाकरिता सुचना द्याव्यात. राऊतांनी रोज सकाळी बोलावं पण, महाराष्ट्राच्या हिताकरिता यथार्थ बोलावं’ असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी बोलताना म्हटले.

त्याचबरोबर ” उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) रोज सभागृहात यावं आणि महाराष्ट्र कसा पुढे नेता येईल याबद्दल आम्हाला मार्गदर्शन कराव. अडीच वर्षात त्यांनी काय काय केलं हे महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे त्यांनी सभागृहात कधी कधी न येता रोजच सभागृहात यावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं” असे ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -