Sunday, April 20, 2025
Homeब्रेकिंग न्यूजधूळवडीच्या दिवशी बॉलिवूडवर शोककळा, अभिनेते देब मुखर्जी यांचं निधन

धूळवडीच्या दिवशी बॉलिवूडवर शोककळा, अभिनेते देब मुखर्जी यांचं निधन

मुंबई : रंग खेळत मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी धूळवड साजरी केली जात आहे. या आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. निर्माते दिग्दर्शक अयान मुखर्जी यांचे वडील बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते देब मुखर्जी यांचे शुक्रवार १४ मार्च २०२५ रोजी पहाटे निधन झाले. मागील काही दिवसांपासून देब मुखर्जी यांची तब्येत खालावली होती. अखेर शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८३ वर्षांचे होते.

मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खान साठीत करतोय गौरीशी डेटिंग

शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता देब मुखर्जी यांची प्राणज्योत मालवली, असे अयान मुखर्जी यांनी सांगितले. संध्याकाळी चार नंतर त्यांच्या पार्थिवावर विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

Alia Bhatt Birthday : सोशल मीडियावर रंगतेय आलियाच्या ३२व्या प्री बर्थडेची चर्चा

‘आंसू बन गए फूल’, ‘अभिनेत्री’, ‘दो आंखें’, ‘बातों बातों में’, ‘कमीने’ आणि ‘गुदगुदी’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये देब मुखर्जी यांनी काम केले होते. त्यांचा मुलगा आयान मुखर्जी आता बॉलिवूडमधली लोकप्रिय दिग्दर्शकांच्या यादीत आहे. नवरात्रउत्सवात देब मुखर्जी विशेष चर्चेत यायचे. ते दरवर्षी ‘नॉर्थ बॉम्बे सार्वजनिक दुर्गा पूजा पंडाल’चं आयोजन करत. हा मुंबईतला सगळ्यात मोठा दुर्गोत्सव आहे. यासाठी अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जी देखील या दुर्गोत्सवाचे काम करतात. दुर्गोत्सवाला अनेक सेलिब्रिटी हजेरी लावली आहे.

देब मुखर्जी यांचे भाऊ जॉय मुखर्जी हे देखील अभिनेता होते. तर दुसरे भाऊ शोमू मुखर्जी. शोमू मुखर्जी यांचं लग्न काजोलची आई तनुजा यांच्याशी झाले. यामुळे देब मुखर्जी हे काजोलचे काका. काजोलला नेहमी त्यांनी लेकीचे प्रेम दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -