Sunday, March 16, 2025
Homeताज्या घडामोडीअमरावती विमानतळाला विमान वाहतुकीचा परवाना !

अमरावती विमानतळाला विमान वाहतुकीचा परवाना !

नागपूर : अमरावती विमानतळावरील वाहतुकीसाठी अत्यावश्यक असणारा नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा (डीजीसीए) एअरोड्रोम परवाना आज मिळाला. यामुळे गेले अनेक वर्षांचे हवाई वाहतुकीचे अमरावतीकरांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे.

अमरावतीचे पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी,” अमरावतीकरांच्या स्वप्नाला पंख भरारीचे लागले!!,” अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी या विमानतळासाठी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख करून त्यांचे आभार मानले व या क्षणाची उत्कटतेने वाट बघणाऱ्या माझ्या अमरावतीकरांचे पालकमंत्री म्हणून मी मनपूर्वक अभिनंदन करतो.

आपल्या प्रतिक्रियेत पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात,” गगनभरारी घेण्याचा अमरावतीकरांच्या स्वप्नातील क्षण आता जवळ आला. अमरावती विमानतळावरील वाहतुकीसाठी अत्यावश्यक असणारा नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा (डीजीसीए) एअरोड्रोम परवाना आज मिळाला.. येथून लवकरच जगभरात उड्डाण सुरू होतील!

नेता कणखर आणि दृष्टा असला की, स्वप्न वास्तवात उतरतात. आपले मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांनी या विमानतळ संबंधीच्या अनेक विषयांत लक्ष घातले. माळरानावरील विमानतळ ते आता उड्डाणापर्यंतच्या प्रक्रियेत मोलाचा पुढाकार घेतला. ते अमरावतीचे पालकमंत्री असतानाही त्यांनी अनेक बैठकी घेतल्या आणि मुख्यमंत्री झाल्यावर सचोटीने पाठपुरावा केल्यानेच, आज केवळ अमरावतीच नव्हे, तर पश्चिम विदर्भातील सर्वांसाठी अभूतपूर्व अशी सुवर्णसंधी उपलब्ध झाली.

मार्च २०२५ च्या अखेरीस विमान वाहतूक सुरू होणार आहे. प्रवास, व्यवसाय, पर्यटन व उद्योगाला चालना मिळून जनतेच्या इच्छा आकांक्षाना प्रगतीचे पंख फुटतील. विकासाला कवेत घेऊन जगावर स्वार होणारे हे उड्डाण असेल.

अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी अमरावतीकरांचे मनापासून अभिनंदन करतो, असे त्यांनी म्हटले आहे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -