बंगळुरू: सोने तस्करी प्रकरणाती आरोपी रान्या रावचा जामीन अर्ज स्पेशल कोर्टाने फेटाळून लावला आहे. त्यांनी स्पेशल कोर्ट फॉर इकॉनॉमिक ऑफेन्सने जामीन अर्ज दाखल केला होता. हा निर्णय न्यायाधीश विश्वनाथ सी गोवदार यांनी दिला. आरोपीवरील आरोपांची गंभीरता पाहता न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला.
रन्या रावला एका हाय प्रोफाईल सोन्याच्या तस्करीमध्ये अटक झाली होती. तिने न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होाता. तिची ही याचिका फेटाळून लावली आहे. न्यायालयाने आरोपाची गंभीरता आणि तपासाची स्थिती लक्षात घेता तिचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
रन्या सध्या न्यायालयीन कोठडीत राहील आणि तिचे वकील आता सेशन कोर्टात जामीन अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत.
सोन्याची तस्करी करण्यासाठी यू ट्युबवरुन घेतले धडे, अभिनेत्री रान्या रावने दिली कबुली
रन्या रावने न्यायालयात केला जामीनासाठी अर्ज
रन्याच्या वकिलांनी हा तर्क दिला की प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे आणि त्यांना जामीनावर सुटका केली पाहिजे. मात्र तिच्यावरील आरोप हे गंभीर असल्याचे सांगत न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळून लावला आहे.