Friday, May 9, 2025

महामुंबईमहाराष्ट्रमनोरंजनमल्टिप्लेक्सताज्या घडामोडी

मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खान साठीत करतोय गौरीशी डेटिंग

मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खान साठीत करतोय गौरीशी डेटिंग
मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खान याचा आज म्हणजे ऐन धूलिवंदनाच्या दिवशी शुक्रवार १४ मार्च २०२५ रोजी साठावा वाढदिवस आहे. या निमित्ताने आमिर खानने त्याच्या रिलेशनशिपची कबुली दिली. आमिर मागील काही महिन्यांपासून गौरी स्प्रॅट सोबत डेटिंग करत आहेत. गौरीला मागील २५ वर्षांपासून ओळखतो पण तिच्यासोबत मागील १८ महिन्यांपासून डेटिंग करत असल्याचे आमिर खानने सांगितले.



गौरी स्प्रॅटही बंगळुरूची रहिवासी आहे. ती आमिर खानच्या प्रॉडक्शन बॅनरसाठी काम करते. गौरीची आई तामिळ असून तिचे वडील आयरिश आहे. गौरीला सहा वर्षांचा मुलगा आहे. ती बंगळुरूमध्ये सलूनची मालकीण असलेल्या रीता स्प्राट यांची मुलगी आहे. लिंक्डइन प्रोफाइलनुसार, गौरीचे शालेय शिक्षण ब्लू माउंटन स्कूलमधून झाले. नंतर २००४ मध्ये लंडनच्या कला विद्यापीठातून एफडीए स्टायलिंग आणि फोटोग्राफीचा फॅशन कोर्स गौरीने केला. सध्या गौरी मुंबईत बीब्लंट सलून चालवत आहे. गौरी आणि आमिर खान मागील काही दिवसांपासून एकत्र राहत आहेत. गौरी आमिरच्या कुटुंबातील सदस्यांना ओळखते. तसेच गौरीची आमिरमुळेच शाहरुख खान आणि सलमान खान सोबत ओळख झाली आहे.



आमिर खान : मूळ नाव - मोहम्मद आमिर हुसेन खान
जन्म : १४ मार्च १९६५, मुंबई
मीडिया रिपोर्टनुसार आमिर खानची एकूण संपत्ती १८६२ कोटी रुपये
पहिले लग्न रीना दत्ता सोबत १९८६ मध्ये झाले आणि घटस्फोट २००२ मध्ये झाला
दुसरे लग्न किरण राव सोबत २००५ मध्ये झाले आणि घटस्फोट २०२१ मध्ये झाला
आमिर खानला पहिल्या दोन लग्नांमुळे एकूण तीन मुले आहेत.



मोठा मुलगा जुनेद खान आणि त्याची सख्खी धाकटी बहीण इरा खान ही आमिर खान आणि रीना दत्ताची मुले आहेत. तर आझाद राव खान हा आमिरचा सर्वात लहान मुलगा आहे. आझाद हा आमिर आणि किरण राव या दांपत्याचा मुलगा आहे. घटस्फोट झाले तरी आमिरचे तिन्ही मुलांशी असलेले नाते उत्तम स्थितीत आहे. जुनेद सध्या सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहे. इराचे फिटनेस कोच नुपुर शिखरेसोबत लग्न झाले आहे. सरोगसीतून जन्मलेला आझाद अजून लहान आहे.
Comments
Add Comment