मेम्फिस : अमेरिकेतील टेनेसी (Tennessee) प्रांतातील मेम्फिस (Memphis) शहरात एक धक्कादायक घटना घडली. कुत्र्याचा पाय पडून पिस्तुलमधून एक गोळी सुटली. गोळी लागल्यामुळे कुत्र्याचा मालक जखमी झाला. मालकाची मैत्रीण थोडक्यात वाचली. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती गोळीबार अशी नोंद करुन करुन एफआयआर तयार केली आहे. अपघाती गोळीबार असल्यामुळे कोणाच्याही विरोधात कारवाई होणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
कुत्र्याचा मालक मैत्रीणीसोबत बेडवर होता. त्यावेळी बेडजवळच पिस्तुल होते. पिस्तुल अनलॉक होते. अचानक कुत्रा बेडजवळ आला. त्याने मालकाला बघून बेडवर उडी मारली. कुत्र्याचा पाय चुकून पिस्तुलाच्या ट्रिगरवर पडला आणि एक गोळी सुटली. ही गोळी मालकाच्या मांडीला लागल्यामुळे तो जखमी झाला. मैत्रीणीने त्याला तातडीने रुग्णालयात नेले. वेळेत उपचार झाल्यामुळे कुत्र्याच्या मालकाचा जीव वाचला. मांडीतून गोळी काढण्यात आल्यामुळे आता त्याची प्रकृती स्थिर आहे.
बेडवर असताना दाखवण्याच्या निमित्ताने पिस्तुल काढणे आणि ते अनलॉक अवस्थेत बेडवर ठेवणे ही गंभीर चूक होती. भविष्यात अशी चूक होणार नाही, अशी कबुली कुत्र्याच्या मालकाने आणि त्याच्या मैत्रीणीने पोलिसांना दिली. पोलिसांनी अपघाताची नोंद करुन दोघांना तोंडी समज दिली आणि आणखी कारवाई करणार नसल्याचे सांगत पुढील कारवाई थांबवली आहे.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…