Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

दहिसरमधील ‘कंट्रोल टॉवर‘च्या स्थलांतर प्रक्रियेस गती – उद्योग मंत्री उदय सामंत

दहिसरमधील ‘कंट्रोल टॉवर‘च्या स्थलांतर प्रक्रियेस गती – उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई : दहिसरमधील विमानचलन ‘कंट्रोल टॉवर’ च्या स्थलांतर प्रक्रियेस गती देण्यात आली आहे. त्यासाठी गोराई येथे जमीन निश्चित करण्यात आली आहे. ही जमीन संबधित विभागाच्या ताब्यात गेल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.


विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून सदस्य अमित साटम यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यासंदर्भात उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले की, दहिसर येथील टॉवरसाठी गोराई येथे जमीन देण्यात आली आहे त्याचप्रमाणे मुंबई उपनगरातील अंधेरी पश्चिम येथील डी. एन. नगर येथे एअरपोर्ट ॲथॉरिटीच्या जमिनीवर असलेल्या ट्रान्समिशन टॉवर्ससाठी जमिनीसंदर्भात समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती जागेची पाहणी करून शिफारस करेल. समितीच्या शिफारशीनंतर याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल. यासंदर्भात केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्चाही करण्यात आली असून याविषयी त्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.


श्री. सामंत म्हणाले, स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींच्या भावना विचारात घेत मुख्यमंत्री यांनी शासनस्तरावर हा विषय प्राधान्याने घेतला आहे. पुढील अधिवेशनापूर्वी जागा निश्चित करून स्थलांतराची प्रक्रिया सुरू केली जाईल. दहिसरचा टॉवर गोराईत हलवला जात आहे, त्याच पद्धतीने अंधेरी येथील टॉवर्स बाबतही कार्यवाही केली जाईल, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.

Comments
Add Comment