Saturday, May 10, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील सर्वोच्च मानाचा संत श्री तुकाराम महाराज पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील सर्वोच्च मानाचा संत श्री तुकाराम महाराज पुरस्कार जाहीर
मुंबई: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील सर्वोच्च मानाचा पुरस्कार प्रथम जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सोहळा येत्या १६ मार्चला श्रीक्षेत्र देहू होणार आहे. लक्षावधी वारकऱ्यांच्या उपस्थितीत तुकाराम बीज सोहळ्याच्या मुख्य दिनी या पुरस्काराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना सन्मानित केले जाणार आहे.


दरम्यान, या पुरस्कार सोहळ्यासाठी संतांचे वंशज तसेच मानाच्या मुख्य सात पालख्यांचे प्रतिनिधी उपस्थित असणार  आहेत. वारकरी संप्रदायातील अतुलनीय योगदानाबद्दल उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौरव केला जाणार आहे. याबाबतची माहिती  जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष श्रीपुरुषोत्तम महाराज मोरे व विश्वस्त यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.


एकनाथ शिंदे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्या कारकि‍र्दीत त्यांनी वारकऱ्यांच्या हिताचे अनेक धडाकेबाज निर्णय घेतले. होते. या निर्णयांमध्ये वारकऱ्यांच्या दिंड्यांना दिलेला निधी, विमा छत्र योजना ,  संत व तीर्थक्षेत्रांसाठी करण्यात आलेले विकासकार्य, प्रत्येक साधुसंतांची केलेली आपुलकीने विचारपूस व घेतलेली काळजी  व अध्यात्मिक सेनेच्या वतीने एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत असणारा थेट संपर्क ह्या शिंदेच्या जमेच्या बाजू आहेत अशी माहिती मिळत आहे.
Comments
Add Comment