सोन्याची तस्करी करण्यासाठी यू ट्युबवरुन घेतले धडे, अभिनेत्री रान्या रावने दिली कबुली

बंगळुरू : सोन्याची तस्करी करण्यासाठी वारंवार दुबई - बंगळुरू असा विमान प्रवास करणारी कानडी अभिनेत्री रान्या राव (Ranya Rao) हिने तपास पथकाशी बोलताना धक्कादायक कबुली दिली. सोन्याची तस्करी करण्यासाठी यू ट्युबवरुन धडे घेतल्याचे रान्या रावने सांगितले. तस्करीसाठी सोनं कसं लपवायचं, कोणत्या देशातून सोनं कसं आणायचं याचे मार्गदर्शन करणारे व्हिडीओ यू ट्युबवर आहेत. हेच व्हिडीओ बघितले आणि आधी सोनं लपवण्याचे तंत्र आत्मसात केले. नंतर तस्करीला सुरुवात केली, अशी कबुली रान्या रावने तपास पथकासमोर दिली.



यू ट्युबवरील ऑनलाईन व्हिडीओ ट्युटोरियल सोन्याच्या तस्करीसाठी सर्वोत्तम मार्गदर्शक असल्याचे रान्या रावने सांगितले. सोन्याच्या तस्करीसाठी विदेशी तस्करांची मदत मिळाल्याचीही रान्या रावने कबुली दिली. रान्या रावची सोन्याच्या तस्करी प्रकरणी २४ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.



वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची मुलगी आणि लोकप्रिय कन्नड (कानडी) अभिनेत्री रान्या राव (Ranya Rao) हिला डीआरआयच्या (Directorate of Revenue Intelligence or DRI / महसूल गुप्तचर संचालनालय) पथकाने केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडले. रान्या पोलीस कॉन्स्टेबल (हवालदार) बसवराजूच्या मदतीने सुरक्षा तपासणी टाळून विमानतळावरुन बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होती. पण डीआरआयच्या पथकाने रान्याला अडवले. यानंतर रान्याची आणि तिच्या सामानाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत रान्याने शरीराभोवती लपेटलेल्या पट्ट्यात १२.५६ कोटी रुपयांचे १४.२ किलो सोने आढळले. हे सोने जप्त करण्यात आले. रान्याच्या घरातून २.६७ कोटींची रोख रक्कम (रोकड) आणि २.०६ कोटी रुपयांचे सोने जप्त केले. या व्यतिरिक्त घरातून तीन मोठे भरलेले खोके जप्त करण्यात आले. एकूण १७.२९ कोटी रुपयांची जप्ती करण्यात आली. रान्या वर्षभरात ३० वेळा दुबईला गेली. ती १५ दिवसांत चौथ्यांदा दुबईवरुन येत होती त्यावेळी तिला अटक झाली.
Comments
Add Comment

Ramdas Athawale: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार पदाची केली हॅट्ट्रिक

मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची तिस-यांदा

Delhi: हातात पुष्पगुच्छ घेऊन थेट शिरला विधानसभेत, अध्यक्षांच्या गाडीजवळ फुलांचा गुच्छ ठेवला अन्...

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेत सुरक्षेचा मोठा भंग झाल्याचे वृत्त आहे. एका वाहनाने बॅरियर तोडून गेट क्रमांक २ मधून

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

Crime News : पाटण्यात माणुसकीला काळीमा; सख्ख्या काकाकडूनच ३ वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार

पाटणा : बिहारची राजधानी पाटणामध्ये नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परसा बाजार

Ladakh: लिलावात २५ हजार रुपयांना विकले गेले १० रुपये किमतीचे अंडे; इराणी पीडितांसाठीचा अनोखा उपक्रम चर्चेत

नवी दिल्ली: लडाखमधील लेह जिल्ह्यातील लोक इराणच्या लोकांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. युद्धाच्या काळात

Delhi: पार्किंगवरून महिला उपनिरीक्षक आणि वृद्ध व्यक्तीमध्ये वाद, पोलिसांनी काय कारवाई केली?

दिल्ली: दिल्लीतील उत्तर रोहिणी परिसरात पोलीस आणि नागरिकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. मिळालेल्या