

स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेची अशी सुरू आहे तपासणी
पुणे : स्वारगेट एसटी डेपोमधील दिवे बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये कोंडून तरुणीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणातील आरोपीबाबत एक मोठी अपडेट आली आहे. या ...
यू ट्युबवरील ऑनलाईन व्हिडीओ ट्युटोरियल सोन्याच्या तस्करीसाठी सर्वोत्तम मार्गदर्शक असल्याचे रान्या रावने सांगितले. सोन्याच्या तस्करीसाठी विदेशी तस्करांची मदत मिळाल्याचीही रान्या रावने कबुली दिली. रान्या रावची सोन्याच्या तस्करी प्रकरणी २४ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.

होळी आणि धूलिवंदनासाठी मुंबईत ११ हजार पोलिसांचा बंदोबस्त
मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात गुरुवार १३ मार्च २०२५ रोजी होळी (होलिकोत्सव) आणि शुक्रवार १४ मार्च २०२५ रोजी धूलिवंदन हे सण साजरे होणार आहेत. रमझान महिना ...
वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची मुलगी आणि लोकप्रिय कन्नड (कानडी) अभिनेत्री रान्या राव (Ranya Rao) हिला डीआरआयच्या (Directorate of Revenue Intelligence or DRI / महसूल गुप्तचर संचालनालय) पथकाने केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडले. रान्या पोलीस कॉन्स्टेबल (हवालदार) बसवराजूच्या मदतीने सुरक्षा तपासणी टाळून विमानतळावरुन बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होती. पण डीआरआयच्या पथकाने रान्याला अडवले. यानंतर रान्याची आणि तिच्या सामानाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत रान्याने शरीराभोवती लपेटलेल्या पट्ट्यात १२.५६ कोटी रुपयांचे १४.२ किलो सोने आढळले. हे सोने जप्त करण्यात आले. रान्याच्या घरातून २.६७ कोटींची रोख रक्कम (रोकड) आणि २.०६ कोटी रुपयांचे सोने जप्त केले. या व्यतिरिक्त घरातून तीन मोठे भरलेले खोके जप्त करण्यात आले. एकूण १७.२९ कोटी रुपयांची जप्ती करण्यात आली. रान्या वर्षभरात ३० वेळा दुबईला गेली. ती १५ दिवसांत चौथ्यांदा दुबईवरुन येत होती त्यावेळी तिला अटक झाली.