

शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा महामार्ग नागपूरपासून सिंधुदुर्गपर्यंत १२ जिल्ह्यांमधून ...
मुंबईत गृहनिर्माण संस्था, उत्सव मंडळं, बैठ्या चाळी तसेच नाक्यानाक्यांवर होलिकोत्सव साजरा केला जातो. उत्सवाच्या नियोजनानुसार गुरुवारी संध्याकाळी होळ्या पेटवल्या जातील आणि शुक्रवारी धूलिवंदन साजरे केले जाईल. मुंबईसह अनेक शहरांमध्ये धूलिवंदनाच्या दिवशीच रंग खेळण्याची पद्धत प्रचलित झाली आहे. रंगपंचमीसाठी अनेक शहरांतील कार्यालयांमधून सुटी दिली जात नाही. यामुळे धूलिवंदनाच्या दिवशीच रंग खेळण्याची पद्धत प्रचलित झाली आहे. धूलिवंदनाच्या दिवशी आबालवृद्ध रंग खेळतात. या काळात समाजकंटकांकडून गैरप्रकार करुन उत्सवाला गालबोट लावण्याचा प्रयत्न होऊ नये यासाठी मुंबईत पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेकदा धूलिवंदनाच्या दिवशी छेड काढणे, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, अश्लील शेरेबाजी असे प्रकार घडतात. जातीय तेढ निर्माण होते. हे टाळण्यासाठी आणि सलोखा राखण्यासाठी पोलीस खबरदारी घेणार आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

MPSC पदभरती आणि पेपरफुटी, कॉपी, गुणांच्या पारदर्शकतेवर विधानपरिषदेत चर्चा
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी - MPSC) संदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. ...
मुंबईतील चौपाट्या, गर्दीच्या ठिकाणी सतत गस्त सुरू राहील. संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त असेल. मद्यपी वाहन चालक, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या व्यक्ती, महिलांशी गैरवर्तवणूक करणारे, अमली पदार्थाची विक्री तसेच सेवन अशा सर्व बेकायदा कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलीस सज्ज आहेत. बेकायदा कृत्य करताना आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. ड्रंक अँड ड्राइव्ह मोहिमेसाठी ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करुन सण उत्साहात साजरा करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Fake Paneer : आर्टिफिशल व फेक पनीर विक्री विरोधात कडक कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : फेक पनीर किंवा आर्टिफिशियल पनीर (Fake Paneer) हे निश्चितच नागरिकांच्या आरोग्यासाठी धोक्याचे आहे. हे पनीर विक्री करीत असलेल्या विक्रेते व संबंधितांवर ...
मुंबईत बंदोबस्तासाठी सात अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात १९ पोलीस उपायुक्त, ५१ सहायक पोलीस आयुक्त, १७६७ पोलीस अधिकारी, ९१४५ अंमलदार, राज्य राखीव पोलिसांच्या तुकड्या, शीघ्र कृती दलाची पथके, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, श्वान पथक, गृहरक्षक दलाचे जवान कार्यरत असतील.