मुंबई : बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचा दमदार अभिनय आणि सौंदर्यांमुळे ती नेहमी चर्चेत असते. तिच्यातील स्पष्ट वक्तशीरपणा तिच्या चाहत्यांना नेहमी आवडतो. नुकतेच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान करीनाला चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या सेक्स आणि इंटीमेट सीन्सबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने आपली प्रतिक्रिया देताना चित्रपटाच्या कथेनुसार हे किती महत्त्वाचे आहे किंवा नाही हे अवलंबून असल्याचे सांगितले. भारतीय सिनेसृष्टीत सेक्स किंवा लैंगिकता हा मानवी अनुभव म्हणून पाहिला जात नाही, असंही ती म्हणाली.
मिळालेल्या माहितीनुसार, करीना कपूर (Kareena Kapoor) सेक्स एज्युकेशन वेब सीरिजसाठी द डर्टी मॅगझिनच्या मंचावर प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री गिलियन एंडरसनसोबतच्या इंटिमेट सीन्सबद्दल मोकळेपणाने बोलली. या मुलाखतीत गिलियनने करीनाला विचारले की, अशा सीनसाठी तू कोणती मर्यादा ठेवली आहेस. यावर करीनाने प्रतिउत्तर देत म्हणाली, “एखाद्या चित्रपटाची कथा पुढे नेण्यासाठी सेक्स सीन्स तितके महत्त्वाचे नसतात. त्याचप्रमाणे ही काही अशी गोष्ट नाही की कथा पुढे नेण्यासाठी ती दाखवलीच पाहिजे. मला माहितीये की ऑनस्क्रीन असे सीन्स करताना मी कम्फर्टेबल नसेन. मी याआधी कधीच तसे सीन्स केले नाहीत. असे सीन स्क्रीनवर दाखवण्यापूर्वी, तुम्ही स्वतःचा विचार केला पाहिजे आणि आदरपूर्वक पाहिले पाहिजे.हे माझं मत आहे. याबाबतीत आम्ही पाश्चिमात्य देशांइतके मोकळे नाही आहोत”, असं करीना पुढे म्हणाली.
View this post on Instagram
करीना कपूर मागील वर्षी अजय देवगणच्या सिंघम अगेनमध्ये दिसली होती. मात्र, यावर्षी तिचा ‘दायरा’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे, ज्याचे दिग्दर्शन ‘राझी’च्या दिग्दर्शिका मेघना गुलजार करत आहेत. या सिनेमात करीना पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.