मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे विधिमंडळ परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षाव्यवस्था असतानाही, विधिमंडळाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या हाकेच्या अंतरावरील येस बँकेच्या बाजूला पादचारी रस्ता रोजा सोडण्यासाठी सायंकाळी तब्बल एक घंटा अडवला जात होता. विधिमंडळासारख्या संवेदनशील ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांचा रस्ता अडवून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होउ शकतो. ही बाब सुजाण नागरिकांनी महापालिका आयुक्त भुषण गगराणी यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई करून रस्ता मोकळा केला.
Western Railway : पश्चिम रेल्वेच्या दोन महिला तिकीट तपासणीस कर्मचाऱ्यांची उत्कृष्ट कामगिरी
डॉ. उषा मेहता चौकात असलेला पादचारी मार्ग रमझान सुरू झाल्यापासून नियमित सायंकाळी रोजा सोडण्यासाठी अडवला जात होता. या पादचारी मार्गावरच फलाहार ठेवून तेथे बैठका अंथरून रोजा सोडण्याचा कार्यक्रम करत होते. यामुळे हा पादचारी मार्ग पूर्णपणे बंद ठेवला जात होता. महापािलकेच्या कारवाईचे कौतुक केले जात आहे.