
नवी दिल्ली : मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातील सर्वोच्च पुरस्कार ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन’ देण्याची घोषणा केली. पंतप्रधान मोदी हे हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना एखाद्या देशाने दिलेला हा २१ वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. ‘मॉरिशसच्या लोकांनी आणि सरकारने मला त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचा निर्णय घेतला आहे. मी हा निर्णय नम्रपणे मोठ्या आदराने स्वीकारतो. हा केवळ माझ्यासाठी सन्मान नाही, तर भारत आणि मॉरिशसमधील ऐतिहासिक बंधनाचा सन्मान आहे,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.(PM Narendra Modi)

इ्स्लामाबाद: बलूच लिबरेशन आर्मीकडून हायजॅक करण्यात आलेल्या जाफर एक्सप्रेस ट्रेनमधील ओलीस ठेवलेल्यांना सोडवण्यासाठी पाकिस्तानचे सैन्य सातत्याने ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसमधील भारतीय समुदायाचे हात जोडून स्वागत केले. त्यांनी आठवण करून दिली की, ‘मी १० वर्षांपूर्वी याच दिवशी मॉरिशसला भेट दिली होती. होळीनंतर एक आठवडा झाला होता. यावेळी मी होळीचे रंग भारतात माझ्यासोबत घेऊन जाईन, असे मोदी म्हणाले. ‘आपण एका कुटुंबासारखे आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय समुदायाला संबोधित करताना म्हटले. या भावनेने. पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम आणि इतर येथे उपस्थित आहेत. मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो, असे ते यावेळी पुढे म्हणाले.(PM Narendra Modi)
यापूर्वी, पंतप्रधान मोदींना २० देशांनी सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले होते. हे पंतप्रधान मोदींच्या जागतिक नेतृत्व क्षमता आणि भारताची वाढती आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा दर्शवते. हे सन्मान पंतप्रधान मोदींच्या जागतिक नेतृत्व क्षमता आणि विविध देशांसोबत भारताचे वाढत असलेले संबंध सिद्ध करतात.