Monday, May 12, 2025

विदेशमहत्वाची बातमी

Pakistan Train Hijack: पाकिस्तानी सैन्याकडून १०४ ओलिसांची सुटका, BLA ने केला ३० जवान मारल्याचा दावा

Pakistan Train Hijack: पाकिस्तानी सैन्याकडून १०४ ओलिसांची सुटका, BLA ने केला ३० जवान मारल्याचा दावा

इ्स्लामाबाद: बलूच लिबरेशन आर्मीकडून हायजॅक करण्यात आलेल्या जाफर एक्सप्रेस ट्रेनमधील ओलीस ठेवलेल्यांना सोडवण्यासाठी पाकिस्तानचे सैन्य सातत्याने ऑपरेशन करत आहे. न्यूज एजन्सीनुसार, पाकिस्तानच्या सैन्याने आतापर्यंत १०४ ओलिसांची सुटका केली आहे. दरम्यान, उरलेल्या प्रवाशांची काय स्थिती आहे याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.


सूत्रांच्या माहितीनुसार, ट्रेन हायजॅक करणारी दहशतवादी अफगाणिस्तानातील मास्टरमाईंडच्या संपर्कात आहेत त्यांनी महिला आणि मुलांना ढाल बनवली आहे. पाकिस्तानच्या सुरक्षारक्षकांनी दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेरले आहे. दोन्हीकडून गोळीबार सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार परिसरामुळे ऑपरेशन कठीण आहे आणि अतिशय सावधतेने सुरू आहे. कारण त्यांनी महिला तसेच मुलांना आपली ढाल बनवली आहे.


पाकिस्तानी सैन्याने १०४ ओलिसांची सुटका केल्याचे म्हटले असतानाच बीएलएनेही दावा केला आहे की पाकिस्तानचे ३०हून अधिक सैनिक मारले गेले आहेत. आता बीएलएने पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद असलेल्या बलूच कैद्यांच्या सुटकेसाठी शहबाज शरीफ सरकारला ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. यावर अद्याप पाकिस्तानी सैन्य तसेच पोलिसांकडून कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही.

Comments
Add Comment