Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीKoliwada Holi : शिमग्याचा सण आयलाय गो… !

Koliwada Holi : शिमग्याचा सण आयलाय गो… !

मुंबई (मानसी खांबे) : होळी म्हटले की कोळीवाड्यात उत्साह शिगेला पोहोचलेला असतो.(Koliwada Holi) मुंबईतील सात बेटांवर वाजंत्रीसह कोळी वेशात नटून-थटून हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. (Holi Wishesh) वरळी कोळीवाड्यातही शिमग्याचा रंग चढला आहे. तब्बल १४ दिवस मुंबईचे मूळचे हे रहिवासी होळीचा सण साजरा करतात. आपल्या होळीच्या एक दिवस आधी वरळीकर कुटुंबाची कोंबड हाऊल थाटामाटात साजरी केली जाते.

Non-Creamy Layer Limitation : नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढणार!

महाशिवरात्रीनंतर येणाऱ्या अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून १४ दिवस होळीचा सण साजरा केला जातो. पौर्णिमेपर्यंत लहान आकाराच्या होळीपासून दिवसागणिक ही होळी मोठी होत जाते. मोठ्या आकाराची होळी दहन केली जाते. सर्वात आधी दहन केल्या जाणाऱ्या होळीला छोटी होळी म्हटले जाते. त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी मोठी होळी साजरी केली जाते. भारतीय कॅलेंडरनुसार यंदा तिथीप्रमाणे १३ मार्च रोजी होळी सण साजरा केला जाणार आहे. मात्र वरळी कोळीवाड्यातील होळी ही एक दिवस आधी साजरी केली जाते. या होळीला कोंबड हाऊल असे संबोधले जाते.

कोलाई भेंडी किंवा नारळाच्या झाडाच्या लाकडाची होळी तयार करून रात्री १२ वाजेच्या सुमारास होळीला अग्नि दिला जातो, त्यानंतर सकाळी कोंबडा आरवेपर्यंत ही होळी जागवली जाते. कोळीवाड्यातील मुले आणि पुरुषमंडळी मोठे रुमाल तसेच शर्ट आणि कानटोपी घालून, तर महिला लुगडे नेसून त्यावर दागदागिने घालून पारंपरिक वेशात रात्रभर होळी नाचवतात. यावेळी कोळी समाजातील नव दाम्पत्याला होळी समोर भेट घालून त्यांच्या हाती ऊस आणि नारळ घेऊन पाच प्रदक्षिणा मारल्या जातात. तसेच मच्छीमारांना त्यांच्या व्यवसायात भरभराट यावी यासाठी समुद्रात मासेमारी करायला जाणारे कोळीबांधव त्यांच्या बोटीला रंगरंगोटी करून त्यावर झेंडे लावून त्याची पूजा करतात, असे वरळी कोळीवाडा ओनर असोसिएशनचे सेक्रेटरी प्रल्हाद वरळीकर यांनी सांगितले.

वरळी कोळीवाड्यात डोक्यावर मडकी घेण्याची परंपरा

जुन्या चालीरितीनुसार, कोळीवाड्यात महिला डोक्यावर मातीची मडकी घेण्याची परंपरा आजही कायम आहे.(Koliwada Holi) लहान मुलींपासून अगदी वृद्ध महिलांपर्यंत अनेक स्त्रिया डोक्यावर अधिकाधिक मडकी घेण्याचा प्रयत्न करतात. सर्वात उंचावर असणाऱ्या मडक्यावर दिवा लावून होळीभोवती नाचतात.

सणाला आधुनिक टच

होळीचा हा सण पारंपरिकतेने साजरा करताना त्याला आधुनिक टच देण्याचा प्रयत्न आजची तरुणाई करत आहे. पारंपरिक वेशात नटून-थटून एखादे समुद्र किनाऱ्याचे लोकेशन ठरवून तेथे कोळी गाण्यावर रील्स बनविणे अशी क्रेझ कोळीवाड्यांत आहे किंवा फोटो शूट करून कोळी गाण्यावर त्याचे मिक्सिंग करण्याकडे अनेकांचा ओढा आहे. होळीच्या वेळी अशी रील्स भाव खात आहेत.(Holi Wishesh)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -