Saturday, May 10, 2025

महामुंबईमहाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजसाप्ताहिकअर्थविश्व

किया कॅरेन्‍सने ३६ महिन्यांत २ लाखांपेक्षा जास्त कार विकल्या

किया कॅरेन्‍सने ३६ महिन्यांत २ लाखांपेक्षा जास्त कार विकल्या
मुंबई : किया या आघाडीच्‍या मास प्रीमियम कारमेकरने त्‍यांचे लोकप्रिय उत्‍पादन कॅरेन्‍सच्‍या लाँचच्‍या ३६ महिन्‍यांमध्‍ये २ लाखाहून अधिक कार विकल्याचे जाहीर केले. किया इंडियाची फॅमिली मूव्‍हर तिच्‍या श्रेणीमधील झपाट्याने विक्री होणारी वेईकल ठरली आहे, जेथे आरामदायीपणा, एैसपैस जागा, तंत्रज्ञान आणि स्‍टाइलच्‍या संयोजनाचा शोध घेणाऱ्या भारतातील कुटुंबामध्‍ये आपला दर्जा स्‍थापित करत आहे. व्‍यावहारिकता व प्रीमियम वैशिष्‍ट्यांचे प्रबळ संयोजन असलेली ही वेईकल वैविध्‍यता आणि वैशिष्‍ट्य-संपन्‍न गतीशीलता सोल्‍यूशन्‍सचा शोध घेत असलेल्‍या ग्राहकांशी संलग्‍न होत आहे.



किया कॅरेन्‍सच्‍या लोकप्रियतेमधून तिच्‍या टॉप ट्रिम्‍ससाठी प्रबळ मागणी दिसून येते, ज्‍यांचे एकूण विक्रीमध्‍ये २४ टक्‍के योगदान आहे. सनरूफ, मल्‍टी-ड्राइव्‍ह मोड्स, हवेशीर सीट्स, किया कनेक्‍ट अशा सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांनी विशेषत: या व्‍हेरिएण्‍ट्सना ग्राहकांमध्‍ये लोकप्रिय बनवले आहे. पॉवरट्रेन पसंतींच्‍या संदर्भात पेट्रोल व्‍हेरिएण्‍ट ५८ टक्‍के विक्रीसह अग्रस्‍थानी आहे, ज्‍यानंतर ४२ टक्‍के विक्रीसह डिझेल व्‍हेरिएण्‍टचा क्रमांक आहे. ३२ टक्‍के ग्राहक ऑटोमॅटिक व आयएमटीचा अवलंब करण्‍यासह दोन्‍ही ट्रान्‍समिशन पर्यायांमधून सहज ड्रायव्हिंग व सोयीसुविधा मिळतात. दुसरीकडे, २८ टक्‍के ग्राहकांनी सनरूफ असलेल्‍या व्‍हेरिएण्‍ट्सना प्राधान्‍य दिले आणि एकूण उत्‍पादन विक्रीपैकी ९५ टक्‍के विक्री ७-आसनी मॉडेल्‍समधून झाली, ज्‍यामुळे ही वास्‍तविक फॅमिली कार असल्‍याचे दिसून येते.



भारतीय कुटुंबांची गरज ओळखून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न किया कॅरेन्‍समधून करण्यात आला आहे. या प्रयत्नांना ग्राहकांना उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचे किया इंडियाच्‍या सेल्‍स अँड मार्केटिंगचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष हरदीप सिंग ब्रार म्‍हणाले. कंपनीला प्रत्‍येक प्रवास अधिक आरामदायी, कनेक्‍टेड व आनंददायी करणारी उत्‍पादने वितरित करत राहण्‍यास प्रे‍रणा मिळाली आहे, असेही ते म्हणाले.



किया कॅरेन्‍सने बाजारपेठेत किया इंडियाचे स्‍थान प्रबळ करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देशांतर्गत बाजारपेठेव्‍यतिरिक्‍त कॅरेन्‍सला आंतरराष्‍ट्रीय मान्‍यता देखील मिळाली आहे, जेथे ७० हून अधिक देशांमध्‍ये २४ हजार ६४ कार निर्यात करण्‍यात आल्या आहेत.
Comments
Add Comment