पुणे : जेजुरीचा मल्हारी आता सर्टिफिकेशनच्या मुद्द्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. राज्यातील मटणाच्या दुकानांना मल्हार सर्टिफिकेशन (Malhar Certification) द्यायचे की नाही यावर क्रिया प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काल खंडोबा देवसंस्थानचे एक विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून मटन दुकानांना देण्यात येणाऱ्या सर्टिफिकेटवर मल्हार नाव देण्यास विरोध केला आहे. खंडोबा हा शाकाहारी देव असल्याने दुसरे कोणतेही नाव या योजनेला द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
तर बुधवारीसकाळी श्री मार्तंड देवस्थानच्या कार्यालयात झालेल्या तातडीच्या बैठकीमध्ये मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या योजनेचे स्वागत करण्यात आले. श्री मल्हार म्हणजेच खंडोबा हा साऱ्या हिंदू धर्माचे कुलदैवत आहे. प्रत्येक मल्हार भक्त आपल्या कोणत्याही शुभकार्याची सुरुवात कुलदैवताच्या साक्षीने व त्याचे स्मरण करून करतो. हिंदू समाजामध्ये मांस मटन विक्री संदर्भात मल्हार सर्टिफिकेट (Malhar Certification) देण्याची योजना सुरू करण्याबाबत घेतलेल्या भूमिकेचे यावेळी स्वागत करण्यात आले.
Fake Paneer : आर्टिफिशल व फेक पनीर विक्री विरोधात कडक कारवाई करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
विश्वस्त मंडळाने बहुमताने या योजनेस मल्हार सर्टिफिकेशन असे नाव देण्यास पाठिंबा दिला. या बैठकीसाठी मुख्य विश्वस्त अभिजीत देवकाते, विश्वस्त मंगेश घोणे, ऍड विश्वास पानसे, अनिल सौंदडे, पोपट खोमणे हे उपस्थित होते. मटन दुकानांना मल्हार सर्टिफिकेशन देण्यास पाठिंबा असल्याचे निवेदन देवस्थान समितीने प्रसिद्ध केले आहे. मुख्य विश्वस्त अभिजीत देवकाते यांनी राज्यातील अनेक दुकानांना मल्हार मटन शॉप, तुळजाभवानी मटन शॉप अशी नावे यापूर्वी देण्यात आलेली आहे. आता विरोध करण्याचे कारण नाही. आम्ही या योजनेचे स्वागत करीत आहोत बहुमताने पाठिंबा देत आहोत, असे सांगितले.