निवडणूक प्रक्रियेला बळकटी देण्यासाठी निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांसोबत चर्चा

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने (ECI) सर्व राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय पक्षांना ३० एप्रिल २०२५ पर्यंत निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कोणत्याही अपूर्ण राहिलेल्या मुद्द्यांवर सूचना देण्याचे आमंत्रण दिले आहे. आयोगाने पक्षांना पाठवलेल्या पत्रामध्ये पक्षाध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांसोबत परस्पर सोयीस्कर वेळी संवाद साधण्याची कल्पना मांडली आहे, जेणेकरून कायदेशीर चौकटीत राहून निवडणूक प्रक्रिया अधिक बळकट करता येईल.


मागील आठवड्यात झालेल्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील मुख्य निवडणूक अधिकारी (CEO), जिल्हा निवडणूक अधिकारी (DEO) आणि निवडणूक नोंदणी अधिकारी (ERO) यांना राजकीय पक्षांसोबत नियमित संवाद साधण्याचे निर्देश दिले होते. तसेच, अशा बैठकीत मिळणाऱ्या सूचनांचे निराकरण प्रस्थापित कायदेशीर चौकटीतच करण्यास सांगितले होते. या संदर्भात, आयोगाने 31 मार्च 2025 पर्यंत कार्यवाही अहवाल सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.


राजकीय पक्ष हे निवडणूक प्रक्रियेशी संबंधित प्रमुख घटक असून, भारतीय संविधान आणि कायदेशीर चौकटीत 28 घटकांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने आपल्या पत्रात "लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 आणि 1951", "मतदार नोंदणी नियम, 1960", "निवडणूक आचारसंहिता 1961", तसेच सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि आयोगाने वेळोवेळी जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे या माध्यमातून पारदर्शक आणि विश्वासार्ह निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित केली असल्याचे नमूद केले आहे. आयोगाच्या वेबसाइटवर ही सर्व नियमावली उपलब्ध आहे.


राजकीय पक्षांनी या विकेंद्रित संवाद प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.

Comments
Add Comment

भारताची अमेरिकेला निर्यात थांबणार?

अमेरिकेकडून रशियावर ५०० टक्के आयात कर ब्राझिल आणि चीनलाही इशारा पुतिन निष्पाप लोकांची हत्या करत असल्याचा

देशातील पहिल्या ‘डिजिटल जनगणने’ला एक एप्रिलपासून सुरुवात

नवी दिल्ली : भारत सरकार २०२७ मध्ये जनगणना करणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा, म्हणजेच घरांची यादी बनवण्याचे काम, १

तामिळनाडूतील निवडणुकीसाठी भाजपची ५६ जागा आणि ३ मंत्रिपदांची मागणी

चेन्नई  : भाजपने मागील वर्षी तामिळनाडूत जयललिता यांचा पक्ष एआयडिएमके यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक

तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड

नवी दिल्ली  : पश्चिम बंगालच्या राजकारणात गुरुवारी पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे मोठी खळबळ

पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत ३ वर्षांची सवलत

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पोलीस दलात भरती होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी योगी सरकारने नववर्षाची

चलन निर्मितीत मोठा बदल; चलन कागदनिर्मिसाठी अत्याधुनिक तंत्र कार्यन्वयित

मुंबई : भारताच्या चलनात नाण्यांप्रमाणे कागदी नोटांनाही तितकेच महत्व आहे. पाचशे, दोन हजार यांसारख्या अनेक नोटा आज