Monday, March 24, 2025
Homeताज्या घडामोडीAirtel : एअरटेलच्या गॅलरीत भाषेवरुन वाद; कर्मचाऱ्याची अरेरावी!

Airtel : एअरटेलच्या गॅलरीत भाषेवरुन वाद; कर्मचाऱ्याची अरेरावी!

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठी भाषेवरुन वाद होत असल्याचे अनेक प्रकारण उघडकीस आले आहे. रेल्वे तिकीट काउंटरसह इतर ठिकाणी परप्रांतियांकडून मराठी बोलण्यावरुन हुज्जत घालत असल्याचे समोर आले आहे. त्यानतर आता मुंबईत एअरटेल (Airtel Gallery Viral Video) कस्टमर केअरमध्येही मराठी भाषेवरुन वाद निर्माण झाला आहे.

किया कॅरेन्‍सने ३६ महिन्यांत २ लाखांपेक्षा जास्त कार विकल्या

कांदिवलीतील चारकोपमधील एका ऐअरटेल स्टोअरमधील महिला कर्मचाऱ्याने मराठी भाषेचा आग्रह धरणाऱ्याला ‘मराठी येत नाही. का मराठी आली पाहिजे ती महत्वाची नाही’ अशा प्रकारची उत्तरे दिली आहेत. या घटनेचा व्हिडिओ काढला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नेमकं प्रकरणं काय?

कांदिवलीतील चारकोपमधील एअरटेल कस्टमर केअरमध्ये एक मराठी तरुण त्याची समस्या घेऊन गेला होता. त्यावेळी तेथील महिला कर्मचाऱ्याने त्याच्याशी उद्धट वर्तन केले. संबंधित महिलेला मराठीतून बोलण्यास सांगितले असता तिने हिंदीतून आरडा ओरडा सुरू केला. त्यानंतर या तरुणाने व्हिडिओ काढला ज्यात तिने उद्दामपणा केला.

तरुणाने काढलेल्या व्हिडिओमध्ये त्याने महिलेला नीट बोलण्यास सांगितले त्यावेळी तिने उडवा उडवीची उत्तर दिली. ती वरिष्ठांना सांगत होती की हा व्यक्ती मला सांगतो की महाराष्ट्रात आहात तर मराठी बोलले पाहिजे. त्या तरुणाने मराठीचा आग्रह कायम ठेवला तर त्यावेळी ती हुज्जत घालत म्हणाली की, का आले पाहिजे मराठी, कुठे लिहिले आहे (क्यू आना चाहिए मराठी, कहाँ पे लिखा हूआ है) तसेच त्यानंतर त्याने प्रश्न विचारल्यास त्यास हिंदीमध्ये बोलण्यास सांगितले. मला समजत नाही हिंदींमध्ये बोल असे सांगितले. आपण हिंदुस्थानात राहतो. कोणतीही भाषा बोलू शकतो. मराठी महत्त्वाची नाही आहे.असे म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -