सोलापूर : सध्या वातावरणात होत असलेल्या चढउतारामुळे सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, घसा दुखी, हात-पाय दुखणे अशा रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. सध्या पहाटेच्या वेळी काही प्रमाणात गारठा तर सकाळी दहाच्या पुढे उन्हाचा जबरदस्त चटका वाढत आहे. मार्च महिन्याच्या सुरवातीलाच तापमानाने ३६ अंशांचा पल्ला गाठला आहे. अशा विरोधी वातावरणाचा सर्वाधिक फटका लहान बालकांना होत असून त्यांना उलट्या, जुलाब यांचाही त्रास होत आहे.
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मॉरिशसमध्ये भव्य स्वागत
हवामान बदलाचा फटका नागरिकांच्या आरोग्याला बसत आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस उन्हाळ्याची चाहूल लागते व मार्च महिन्यात उन्हाळ्याला सुरवात होते परंतु, यावर्षी थंडीचे प्रमाण कमी असल्याने फेब्रुवारीच्या सुरवातीला उष्णतेचा पारा वाढला. एप्रिल, मे महिन्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यातच वाढती लग्नसराई व विविध कार्यक्रम वाढले असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना पिण्याच्या पाण्यात बदल होत असल्याने आजारात वाढ होत आहे.