Thursday, March 20, 2025
Homeताज्या घडामोडीCongo Football Player : काँगोमध्ये मोठा अपघात! बोट उलटल्याने 25 जणांचा मृत्यू,...

Congo Football Player : काँगोमध्ये मोठा अपघात! बोट उलटल्याने 25 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये फुटबॉलपटूंचा समावेश

किंसासा : काॅंगोमध्ये एक बोट उलटल्याने मोठा अपघात झाला आहे. यामध्ये २५ जणांचा मृत्यू झाला. या बोटीवर अनेक फुटबॉलपटूही होते.(Congo Football Player)  मुशीचे स्थानीय अधिकारी रेनेकल क्वातिबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोट अपघातानंतर आतापर्यंत जवळफास 30 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, अनेक लोक अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.

काॅंगो येथे क्वा नदीत बोट उलटल्याने २५ जणांचा मृत्यू झाला.तर ३० जणांना वाचवण्यात यश आले आहे.यामध्ये अजूनही अनेक जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे.या बोटीत अनेक फुटबॉलपटूही प्रवास करत होते.मीडिया ररिपोर्टनुसार, संबंधित प्रांत प्रवक्ते अ‍ॅलेक्सिस म्पुटू यांनी म्हटले आहे की, काही फुटबॉलपटू रविवारी(दि. ९)रात्री माई-न्डोम्बे प्रांतातील मुशी शहरात एका सामना खेळून परतत असताना त्यांना घेऊन जाणारी बोट क्वा नदीत उलटली.

https://prahaar.in/2025/03/11/thane-municipal-corporation-will-provide-free-shadu-soil-and-space-for-making-idols/

काँगोमध्ये रस्ते आणि इतर वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नसलेल्या दुर्गम भागांतील नागरिकांसाठी नद्या हा वाहतुकीचा एक मुख्य पर्याय आहे. महत्वाचे म्हणजे, काँगोतील १० कोटींहून अधिक लोक हे नद्यांवर अवलंबून आहेत. मात्र सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या उपकरणांची कमतरता आणि बोटिंची गर्दी, यामुळे अशा प्रकारचे अपघात सर्वसामान्य झाले आहेत.

काँगोमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक बोट अपघात झाले असून यांत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. येथे मुबलक रस्ते नसल्याने लोकांना नदी मार्गाने प्रवास करावा लागतो. मात्र असुरक्षित बोटींमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होता. हे अपघात रोखण्यासाठी, सरकार सागरी सुरक्षा नियम लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, तरीही अशा अपघातांमध्ये दरवर्षी अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -