
किंसासा : काॅंगोमध्ये एक बोट उलटल्याने मोठा अपघात झाला आहे. यामध्ये २५ जणांचा मृत्यू झाला. या बोटीवर अनेक फुटबॉलपटूही होते.(Congo Football Player) मुशीचे स्थानीय अधिकारी रेनेकल क्वातिबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोट अपघातानंतर आतापर्यंत जवळफास 30 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, अनेक लोक अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. काॅंगो येथे क्वा नदीत बोट उलटल्याने २५ जणांचा मृत्यू झाला.तर ३० जणांना वाचवण्यात यश आले आहे.यामध्ये अजूनही अनेक जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे.या बोटीत अनेक फुटबॉलपटूही प्रवास करत होते.मीडिया ररिपोर्टनुसार, संबंधित प्रांत प्रवक्ते अॅलेक्सिस म्पुटू यांनी म्हटले आहे की, काही फुटबॉलपटू रविवारी(दि. ९)रात्री माई-न्डोम्बे प्रांतातील मुशी शहरात एका सामना खेळून परतत असताना त्यांना घेऊन जाणारी बोट क्वा नदीत उलटली.

ठाणे : पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासाठी मूर्तीकारांना ठाणे महापालिकेतर्फे शाडूची माती आणि मूर्ती घडविण्यासाठी जागा विनामूल्य देण्यात येणार आहे. ...