IPL 2025मुळे पाकिस्तानविरुद्ध नाही खेळणार न्यूझीलंडचे दिग्गज खेळाडू

मुंबई: न्यूझीलंड क्रिकेटने पाकिस्तानविरुद्ध १६ मार्चपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. मायकेल ब्रेसवेलच्या हाती संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. रचिन रवींद्र, मिचेल सँटनर हे खेळाडू २२ मार्चपासून सुरू होत असलेल्या आयपीएल २०२५ लीगमध्ये खेळणार आहे. त्यामुळे ते या टी-२० मालिकेचा भाग असणार नाहीत.


चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर दोन्ही देशांदरम्यानची ही पहिली मालिका आहे. एकीकडे न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचले होते. तर दुसरीकडे यजमान पाकिस्तान ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला होता. पाकिस्तान न्यूझीलंड दौऱ्यावर ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर ३ सामन्यांची वनडे मालिकाही खेळणार आहे. न्यूझीलंडने सध्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. मिचेल सँटनरच्या अनुपस्थितीत ब्रेसवेलला कर्णधार बनवण्यात आले आहे.



आयपीएलमुळे पाकिस्तानविरुद्ध मालिकेत खेळणार नाहीत हे खेळाडू


मिचेल सँटनर आणि रचिन रवींद्र पाकिस्तानविरुद्ध टी-२० मालिकेत सामील नाहीत. दोघेही खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार आहे. सँटनर आयपीएल २०२५मध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळणार तर रचिन रवींद्र चेन्नई सुपर किंग्समध्ये सामील आह.



पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी न्यूझीलंड संघ


माइकल ब्रासवेल (कर्णधार), फिन एलन, मार्क चॅपमॅन, जॅकब डफी, जॅक फाउलकेस (चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी), मिच हे, मैट हेनरी (चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी), काइल जेमीसन (सुरूवातीच्या ३ सामन्यांसाठी), डेरिल मिशेल, जिमी नीशम, विल ओ'रुरके (सुरूवातीच्या ३ सामन्यांसाठी), टिम रॉबिन्सन, बेन सियर्स, टिम सेफर्ट, ईश सोढ़ी.

Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या