मुंबई: न्यूझीलंड क्रिकेटने पाकिस्तानविरुद्ध १६ मार्चपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. मायकेल ब्रेसवेलच्या हाती संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. रचिन रवींद्र, मिचेल सँटनर हे खेळाडू २२ मार्चपासून सुरू होत असलेल्या आयपीएल २०२५ लीगमध्ये खेळणार आहे. त्यामुळे ते या टी-२० मालिकेचा भाग असणार नाहीत.
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर दोन्ही देशांदरम्यानची ही पहिली मालिका आहे. एकीकडे न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचले होते. तर दुसरीकडे यजमान पाकिस्तान ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला होता. पाकिस्तान न्यूझीलंड दौऱ्यावर ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर ३ सामन्यांची वनडे मालिकाही खेळणार आहे. न्यूझीलंडने सध्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. मिचेल सँटनरच्या अनुपस्थितीत ब्रेसवेलला कर्णधार बनवण्यात आले आहे.
आयपीएलमुळे पाकिस्तानविरुद्ध मालिकेत खेळणार नाहीत हे खेळाडू
मिचेल सँटनर आणि रचिन रवींद्र पाकिस्तानविरुद्ध टी-२० मालिकेत सामील नाहीत. दोघेही खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार आहे. सँटनर आयपीएल २०२५मध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळणार तर रचिन रवींद्र चेन्नई सुपर किंग्समध्ये सामील आह.
पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी न्यूझीलंड संघ
माइकल ब्रासवेल (कर्णधार), फिन एलन, मार्क चॅपमॅन, जॅकब डफी, जॅक फाउलकेस (चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी), मिच हे, मैट हेनरी (चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी), काइल जेमीसन (सुरूवातीच्या ३ सामन्यांसाठी), डेरिल मिशेल, जिमी नीशम, विल ओ’रुरके (सुरूवातीच्या ३ सामन्यांसाठी), टिम रॉबिन्सन, बेन सियर्स, टिम सेफर्ट, ईश सोढ़ी.