
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील प्रयाग राज येथे कुंभमेळा पार पडला. देश-विदेशातील कोट्यवधी भाविक कुंभमेळ्यादरम्यान येथील संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी आले होते. काही मंडळींनी येथील पाण्याच्या शुद्धतेवर आक्षेप घेतला होता. संगमावरील गंगेचे पाणी कुंभमेळ्यादरम्यान स्नानासाठी योग्य होते, असे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने लोकसभेत सोमवारी स्पष्ट केले आहे. (Kumbhmela 2025)

'हॅकर' शोधून काढण्यात पोलिसही ठरलेत हतबल! मुंबई : सोशल मीडिया हॅकिंगचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. अशातच आता महाराष्ट्रातील नवनवीन पद्धतीने ...
२८ फेब्रुवारी २०२५ रोजी, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे एक दीर्घ अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार, संगमाचे पाणी सर्व निर्धारित मानकांची पूर्तता करत होते. (Kumbhmela 2025)
सेंट्रल पोल्यूशन कंट्रोल बोर्डाचा नवा अहवाल :
१२ ते २६ जानेवारी दरम्यान करण्यात आलेल्या परीक्षणाच्या आधारे, संगमाचे पाणी स्नान करण्यायोग्य नव्हते, असे सांगण्यात आले होते. यावर, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या निर्देशानुसार, सविस्तर तपासणी करण्यात आली.