शासनाच्या सर्व विभागांची माहिती 'सीएम डॅश बोर्ड'वर लवकरच उपलब्ध - मुख्यमंत्री

मुंबई : शासनाच्या सर्व विभागांची माहिती जनतेला 'सीएम डॅश बोर्डवर' लवकरच उपलब्ध होईल यामध्ये न्यायालय,रेरा तसेच कायदा व सुव्यवस्था या सेवांचाही समावेश करावा, 'स्वॅस' (S३WaaS) या माहिती तंत्रज्ञान विभाग अधिकृत प्रणालीमध्ये 34 विभागांच्या संकेतस्थळाच्या सेवांबरोबर शासनाच्या सर्व विभागांचाही लवकर समावेश करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


विधानभवन येथे सीएम डॅशबोर्ड सादरीकरणासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनुटिया, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, संचालक अनिल भंडारी यासह आयटी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'सीएम डॅश बोर्ड' संकेतस्थळ आणि 'स्वॅस' माहिती प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,जनतेला कोणत्याही योजनांची माहिती तात्काळ एकाच संकेतस्थळावर मिळावी यासाठी सीएम डॅश बोर्ड जनतेला उपयुक्त ठरावा. शासनाच्या धोरणात्मक योजना, त्यांची प्रगती आणि सद्यस्थिती, अद्ययावत माहिती, केंद्र व राज्य शासनाच्या योजना, थेट आर्थिक लाभ देणाऱ्या योजना, विभागनिहाय माहिती यामध्ये असावी यासाठी इतर कोणत्याही संकेतस्थळावर जाण्याची गरज भासू नये. यामध्ये न्यायालय, कायदा व सुव्यवस्था तसेच रेराची देखील माहिती असावी. https:// cmdashboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जनतेला शासनाच्या सर्व विभागांची माहिती लवकरच उपलब्ध होणार आहे. हे संकेतस्थळ दिव्यांगानाही सहज हाताळता येणार असून माहितीचा अधिकार देखील यावर उपलब्ध असेल.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माहिती तंत्रज्ञान विभागातंर्गत राष्ट्रीय सूचना केंद्राची 'स्वॅस'(S३WaaS) ही प्रणाली आहे.या प्रणालीमध्ये राज्यातील ३४ संकेतस्थळांचा समावेश आहे यामध्ये इतर विभागांच्या संकेतस्थळांचाही समावेश वाढवा.ही प्रणाली सुरक्षित असून सहजरित्या एकाच ठिकाणी उपलब्ध असून स्मार्ट फोन व संगणकावरही नागरिकांना उपलब्ध होणार आहे.


माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनुटिया यांनी माहिती तंत्रज्ञान विभाग हा 'सीएम डॅश बोर्ड व 'स्वॅस'(S३WaaS) ही प्रणाली सातत्याने अद्यावत करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.

Comments
Add Comment

पारंपरिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ

मुंबई : भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रॅन्ड प्राडा, लिडकॉम (संत

लोकलच्या दारात उभे राहणे म्हणजे निष्काळजीपणा नव्हे; हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबई : स्वप्नांची दुनिया आणि मायानगरी असलेल्या मुंबईत प्रत्येक जण आपली स्वप्न पूर्ण करायला येत असतो. आणि बघता

आयआयटी बॉम्बेकडून भारतासाठी ‘स्वदेशी एआय’ची तयारी

भारतीय भाषांसाठी नव्या तंत्रज्ञान युगाची सुरुवात मुंबई : देशातील कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल

भोसरी भूखंड घोटाळ्यात एकनाथ खडसे यांना दणका

दोषमुक्तीबाबतचा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला मुंबई : एकनाथ खडसे यांनी महसूल मंत्री असताना आपल्या पदाचा

कस्तुरबा रुग्णालयातील बर्न्स केअर कक्षाची होणार सुधारणा

आयसीयूसह सर्वसाधारण खाटांची जागा सुसज्ज मुंबई : संसर्गजन्य रोगाच्या आजारांसाठी असलेल्या कस्तुरबा

जुनी शालेय इमारत पाडताना पोर्टेबल पर्यायी शाळा आसपासच सुरु करणार

पुनर्विकास करण्यात येणाऱ्या शालेय इमारतींसाठी महापालिकेने उचलले असे पाऊल मुंबई : माहिममधील महापालिका शाळा