
मुंबई : कोकणातील चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.(Holi Special Kokan Train) मध्य रेल्वेने दादर-रत्नागिरी मार्गावर होळीसाठी ११ मार्च पासून विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीच्या एकूण सहा फेऱ्या होणार आहेत. ही गाडी पूर्णपणे अनारक्षित धावणार आहे.

केरळ : सोशल मीडियाच्या प्रभावामुळे घडलेली एक धक्कादायक घटना केरळमध्ये समोर आली आहे. फिटनेस आणि वजन कमी करण्याच्या नादात १८ वर्षीय तरुणीने आपले प्राण ...
गाडी क्र. ०११३१ दादर रत्नागिरी होळी विशेष गाडी ११, १३ व १६ मार्च, २०२५ दुपारी २:५० ला सुटून रात्री ११:४० ला रत्नागिरीला पोहोचेल. परतीची गाडी क्र. ०११३२ रत्नागिरी दादर गाडी १२, १४ आणि १७ मार्च २०२५ पहाटे ४:३० ला सुटून दुपारी १:२५ ला दादरला पोहोचेल. गाडीला एकूण १६ डबे असतील. त्यातील सर्वसाधारण श्रेणीचे १४, तर एसएलआर २ डबे असतील. (Holi Special Kokan Train) ही विशेष गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबेल.