
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या तसेच ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानकाच्या समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल परिसरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. पुतळ्यावर विविध पक्षी बसून विष्टा करित असल्याने पुतळ्याची एक प्रकारे विटंबनाच होत आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर लवकरात लवकर संरक्षक छत्री बसवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश वराडे यांनी केली आहे.
/>
वराडे यांच्या लक्षात येताच ठाण्यातील प्रशासनाच्या माध्यमातून बसविण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळ्यावर सुरक्षा छत्री बसविण्याची लेखी मागणी राज्य शासनाच्या मंत्रालयातील नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे तसेच ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे आतातरी शासनाकडे आणि प्रशासनाकडे करण्यात आलेल्या मागणीची दखल घेऊन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर सुरक्षा छत्री बसविणार का? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.