Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीLadki Bahin Yojna 2025 : लाडक्या बहिणींना दरमहा मिळणार १५०० रुपयेच!

Ladki Bahin Yojna 2025 : लाडक्या बहिणींना दरमहा मिळणार १५०० रुपयेच!

अडीच कोटी महिलांसाठी वर्षाला होणार ३६ हजार कोटींचा खर्च

मुंबई  : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojna) योजनेंतर्गत सुमारे २ कोटी ५३ लाख लाभार्थी महिलांना जुलै, २०२४ पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी ३३ हजार २३२ कोटी रुपये खर्च झाला आहे. सन २०२५-२६ मध्ये या योजनेकरिता एकूण ३६ हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन आहे, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत कोणतेही वाढ झाली नसल्याचे अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले. सुमारे अडीच कोटी महिलांना सध्या अनुदान दिले जात असून त्यासाठी वर्षाला ३६ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. आता लाभार्थींची संख्या पाच लाखांनी कमी झाली आहे. लाडक्या बहीण योजना बंद होणार असल्याच्या अफवा विरोधकांकडून पसरवल्या जात असतानाच निधीची तरतूद करण्यात आली आहे.

Chef Vishnu Manohar : जागतिक कीर्तीच्या ‘शेफ’ची कोण करतेय बदनामी?

राज्यातील ५ लाख महिला ठरल्या अपात्र

सध्या लाडकी बहीण योजनेत विविध निकष लावण्यात आले आहेत. यानुसार लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या ५ लाख महिलांना अपात्र करण्यात आले आहे. त्यामुळे लाखो लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. लाडकी बहीण योजनेच्या उधळपट्टीला लगाम घालण्यासाठी निकष लावल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून ही योजना रद्द होईल, अशी चर्चाही रंगली होती. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आम्ही आधी छाननी केली नाही, सरसकट योजना लागू केली. त्यात निकष घातले होते, पण काही लोकांनी निकष न पाहताच अर्ज केले. तरीही सरकारने कोणतीही काटछाट केली नाही. अनेक महिलांनी योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे आता आम्ही निकषात बसणाऱ्यांनाच योजनेत ठेवणार आहोत. उद्या कॅगही आम्हाला जाब विचारेल. पण छाननीतून फार महिलांना डावलले जाणार नाही. कमी महिला अपात्र ठरतील, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. (Ladki Bahin Yojna)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -